Monday, August 15, 2022
Homeअहमदनगरहत्यार हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करणं पडलं महागात

हत्यार हातात घेऊन व्हिडिओ बनवून व्हायरल करणं पडलं महागात

तरुण उत्साहाच्या भरात सोशल मीडियावर कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर त्यामध्ये कोणाचीच गय केले जाणार नाही कायदा-सुव्यवस्था सर्वांना राखणे गरजेचे आहे यातून कुणाची भावना अथवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेले व्हिडिओ निदर्शनास आले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार गुन्हे शाखा युनिट ६चे पोलीस निरीक्षक गणेश माने म्हणाले

वाघोली प्रतिनिधी (दिनांक 30जून)

तरुणाईचा कल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढत असताना ,तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असतात परंतु काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर  कोयता, तलवार,पालघन इत्यादी  हत्यारे हातात घेऊन छायाचित्रिकरण करून सोशल मीडियावर प्रसिद्ध करत दहशत निर्माण करणाऱ्या तीन जणांना पुणे शहर पोलीस क्राईम ब्रँच युनिट सहाच्या पथकानं अटक केली आहे.            

त्या अनुषंगाने युनिट चे हद्दीत गस्त करत असताना पोलीस शिपाई टिळेकर व काटे यांना माहिती मिळाली की तलवार व पालघन हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करणारे व्यक्ती हिंगणे मळा हडपसर येथे फिरत आहे सदर बाबत गुन्हे शाखा युनिट सहा पुणे चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळविले असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करुन माहिती प्रमाणे नमूद ठिकाणी कारवाई करून आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी 1)नितीन सुंदर दहिरे (वय 22 वर्षे रा. नवी म्हाडा बिल्डींग, नंबर 11 शिंदे मळा,हडपसर, पुणे ) 2)अनिकेत अशोक कुंदर (वय 22 वर्षे रा. नाईकनवरे बिल्डींग, घर नं 7,डी मार्ट च्या मागे ससाणे नगर, हडपसर, पुणे) यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून पालन व तलवार मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्याराचा कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 एक्स 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तसेच पोलीस शिपाई दाखवणे व पोलीस शिपाई व्यवहारे यांना माहिती मिळाली की पालघर हातात घेऊन व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत पसरवणारा युवक हा गायरान वर झोपडपट्टी वाघोली येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून कुणाल मोहन जाधव( वय 21 वर्षे राहणार गायरान झोपडपट्टी वागेश्वर नगर वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे) यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे लोखंडी पालघन मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस स्टेशन भारतीय हत्याराचा कायदा कलम 4 (25) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)सह 135 पुणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे,अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त पुणे श्रीनिवास घाडगे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण  बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलिस निरीक्षक गणेश माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे,नितीन मुंडे प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे,सुहास तांबेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!