सावित्रीबाई शांतीलाल दरेकर यांच वृद्धापकाळाने निधन

0
367

सणसवाडी

सणसवाडी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शांतीलाल (अण्णा )केशवराव दरेकर यांच्या पत्नी कै. सौ. सावित्राबाई शांतीलाल दरेकर याचं वृद्धापकाळाने दुःखत निधन झालं आहे.

त्यांच्या पश्चात पती, मुले मुली, दीर, सुना, नातवंड अशा परिवार असून जुन्या काळातील मोठ्या कुटूंबातील कै. श्री.पठाणराव केशवराव दरेकर यांच्या त्या भावजयी तर पांडुरंग शांतीलाल दरेकर आणि माजी चेअरमन सुहास शांतीलाल दरेकर यांच्या त्या मातोश्री होत्या.माजी सरपंच अंकुश शिवले यांच्या त्या आत्या होत्या.

वृद्धापकाळामुळे त्यांच्यावर शिक्रापूर येथील माऊलीनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सणसवाडी सामाजिक,राजकीय, शिक्षण आणि व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे. मोठ्या कुटूंबातील सर्व मुला नातवंडाची लाडकी नानी हरपल्याच भावना व्यक्त होत आहे. पती,दीर,जावा या कुटूंबाच्या मागे असणाऱ्या जबाबदारी नेटाने पार पडत कुटूंबाचा आधार आज हरपला आहे. नानींच्या चिरंतर आत्मास सदगती लाभो त्यांचा अंत्यविधी सणसवाडी येथील स्मशान भूमी मध्ये दुपारी २:००वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here