कोरेगाव भीमा –
कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्ष यांच्या कोरेगाव भिमा येथील कार्यालयास भीम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट दिली असून सामाजिक सलोखा व अन्याय ,अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित येऊन कार्य करू यासह विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली.
स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्ष यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे व विनय रतन सिंग,प्रदेशाध्यक्ष,भीम आर्मी गुजरात , दत्तू मेढे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष, सीताराम गंगावणे महारष्ट्र प्रदेश महासचिव भीम आर्मी, अमीर इनामदार, राष्ट्रीय सचिव स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्ष, दत्तात्रय भाऊसाहेब गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा व भविष्यातील सामाजिक , राजकीय वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

समाजातील विवध घटकांना न्याय देण्याचा व मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर एकत्रित वाटचाल करण्याबरोबरच भारतीय राज्य घटनेने दिलेल्या नागरिकांच्या अधिकारांचे , समता, स्वातंत्र्य,बंधुता ,न्याय या मूल्यांची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देण्याबरोबरच अन्याय ,अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी एकत्रित काम करणार आहेत.
महापुरुषांच्या विचारांवर व समाजातील उपेक्षित व वंचित घटकांसाठी काम करण्यासाठी , सामाजिक एकता व बंधुता राखण्याबरोबरच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करणार आहोत राजेशसिंह ढेरंगे,
(राष्ट्रीय अध्यक्ष ,स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्ष)
महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या सोबत आमचा झेंडा आणि दांडा ( दंडा) कायम सोबत असणार आहे. समाजातील उपेक्षित , वंचित व दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व महापुरुषांच्या विचारांवर आधारित एकत्रित वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विनय रतन सिंग , (प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी गुजरात)
यावेळी संदीप ढेरंगे , झांभर माळी,महेश कुलकर्णी , दीपा कुलकर्णी , रियाज पठाण, दीक्षांत भालेराव उपस्थित होते.