सणसवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते कै. श्री नाथाभाऊ बबनराव साठे (वय ६५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांच्या जाण्याने सणसवाडी गावातील सामाजिक,राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ, मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार असून माजी उपसरपंच संभाजी साठे यांचे ते चुलत भाऊ होते. खंडोबा देवाचे ते भक्त होते.जुन्या काळातील दूध व्यावसायिक अशी त्याची ओळख आहे. दुष्काळ जन्य परिस्थिती मध्ये संपूर्ण सणसवाडी गावाला त्यांच्या मालकी हक्काची असणाऱ्या विहिरीतून मोफत पाणीपुरवठा केला गेला होता. त्यांच्या जाण्याने साठे कुटुंबियांना जे दुःख झालेले आहे हे दुःख सावरण्याची ताकत परमेश्वर त्यांना देवो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
त्यांचा अंत्यविधी सणसवाडी येथील स्मशानभूमी मध्ये २१ एप्रिल २०२२रोजी सकाळी सात वाजता होणार आहे
शोकाकुल समस्त सणसवाडी ग्रामस्थ
Home आरोग्य निधन वार्ता सामाजिक कार्यकर्ते कै. श्री नाथाभाऊ बबनराव साठे (वय ६५) यांचे दीर्घ आजाराने...