समूहगीत स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयास प्रथम क्रमांक

0
365

शिरूर (प्रतिनिधी साहेबराव चव्हाण)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सध्या ‘ स्वराज्य महोत्सव ‘ सुरू असून शिरूर नगरपरिषद तसेच जायन्ट्स क्लब , पसायदान संस्था , महाराष्ट्र साहित्य परिषद , शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने समूहगीत स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्पर्धेमध्ये शिरूर शहरातील २१ शाळांनी सहभाग घेतला होता अत्यंत जोशपूर्ण आणि उत्सहाच्या वातावरणात स्पर्धा पार पडली .समूहगीत स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयास प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.सदर स्पर्धेचे उदघाटन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अँड प्रसाद बोरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यामध्ये जयोस्तुते , हे राष्ट्र देवतांचे नन्हा मुन्ना राही हू , बलसागर भारत होवो आम्हां , उत्तुंग आमुची उत्तर सीमा इ . देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालय प्रथम क्रमांक , विद्याधाम प्रशाला शिरूर द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूलने तृतीय क्रमांक पटकविला .

समूहगीत स्पर्धेत बालाजी विश्व विद्यालयातील विद्यार्थी गीत सादर करताना

सदर कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ शिरूर – हवेलीचे आमदार अँड अशोक पवार, शिरूरचे तहसीलदार प्रशांत पिसाळ,शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमास डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य डॉ समीर ओंकार,माजी मुख्याध्यापक व्ही . डी . कुलकर्णी , निलेश खाबिया,कडेकर ,व्ही बी . आंबेकर , सतीश धुमाळ , प्राचार्य विनायक म्हसवडे , माजी सरपंच नामदेव घावटे इ . मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here