वाघोली प्रतिनिधी
वाघोली (ता.हवेली)या ठिकाणी सन्मान स्त्री कर्तृत्वाचा,आदर नारी शक्तीचा हे घोष वाक्य घेत स्व. गणेश राजा भाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानच्या सचिव प्रियांका स्वप्निल दसगुडे (चौधरी) यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य घटकांतील साफसफाई आणि शिक्षणाची अहोरात्र सेवा करणा-या सफाई कामगार आणि अंगणवाडी सेविका यांना साडी देवून सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू लोकांना अन्नधान्य त्याचप्रमाणे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटूंबांना मुलांच्या विविह लावून देत मोठ्या समस्यातूनमार्ग काढत गरीब कुटुंबांना आधार देण्याचे काम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून गुणगौरव सोहळा आयोजित करून मुलांना प्रेरित करण्याचे काम नेहमीच संस्थेच्या माध्यमातून करण्यात आल्याचे यावेळी शिवसेना नेते राजाभाऊ चौधरी यांनी यावेळी सांगितले.
गोरगरीब कष्टकरी कुटूंबातील मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम तसेच त्यांना आवश्यक असणा-या पोषण आहार देवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असणाऱया अंगणवाडी सेविका , मदतनीस त्याच प्रमाणे सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणा-या महिलांचा सन्मान करण्याची संकल्पना आज पूर्ण होत आहे. यांचा नक्कीच मला स्त्री म्हणून आनंद होत आहे.
प्रियांका स्वप्निल दसगुडे ( चौधरी )
(सचिव , स्व. गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठान, पुणे )
गोरगरीब कष्टकरी कुटूंबातील श्रम कार्ड्स ,आधारकार्डस त्याचप्रमाणे उपस्थित महिलांच्या दोन लाख रुपयांचे विमा कवच त्याच प्रमाणे गरजू लोकांना शासनाच्या योजना बरोबरच विविध सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठानच्यावतीने नेहमी प्रयत्न केले जातील.
यावेळी वडगाव शेरी शिवसेना प्रमुख राजाभाऊ चौधरी, प्रियांका स्वप्निल दसगुडे ( चौधरी ), शिवसेना प्रमुख दत्तात्रय बेडांबले , विलास दोरगे ,युवासेना प्रमुख विशाल सातव , कुणाल आव्हाळे , विजय देडे ,बाजीराव पाचारणे ,अंगणवाडी पर्यवेक्षिका सुवर्णा घोरपडे यांच्यासह अंगणवाडी सेविका , मदतनीस आणि सफाई कामगार उपस्थित होत्या.