सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा

0
503

एकूण बारावीचा निकाल जाहीर ; ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सणसवाडी प्रतिनिधी

सणसवाडी (ता. शिरूर ) येथील नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी इत्तया बारावी १००%निकालाची परंपरा कायम राखली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MHBHSE) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा निकाल हा ९४.२२ टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहता येणार आहे. यापूर्वी २०२१ मध्ये बारावी उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६३ टक्के इतकी होती. माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय सणसवाडी

प्रथम पाच क्रमांक येणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे

इयत्ता १२वी विज्ञान शाखा

1.कोनाळे श्वेता रमेश = 82.50% 2.वांढेकर प्रांजली प्रकाश = 75.50% 3.गोसावी भूषण राजेंद्र = 74.33% 4.पवार अमृता भगवान = 71.00% 5.. दिवटे विश्रांती लक्ष्मण = 69.17%

इयत्ता १२वी (वाणिज्य शाखा)

1.नवगिरे नेहा सुनील =88.17% 2.खांडेकर अश्विनी प्रभाकर =81.50% 3.सुकाळे प्रतीक कैलास =75.00% 4.हरगुडे पायल दिनेश =73.83% 5.फंड ऋतुजा सुनील =73.00%

यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत असताना ग्रामपंचायत सणसवाडीचे सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब दरेकर, शिक्षण तज्ञ अमोल दरेकर, शाळेचे प्राचार्य बाबासाहेब गोरे आणि पर्यवेक्षिका आर कर्डिले यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here