सणसवाडी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

0
1131

सणसवाडी

सणसवाडी (ता. शिरूर ) येथील गणेशात्सवनिमित्त स्व. ह भ प यशवंत दरेकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर गणेश तरुण मंडळ सणसवाडी (चेअरमन वस्ती) आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, सरपंच संगीता नवनाथ हरगुडे,मार्केट कमिटी माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे,उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे सदस्य ग्रामपंचायत राजेंद्र दरेकर,रामदास दरेकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

सणसवाडी येथील गणेश तरुण मंडळ सणसवाडी (चेअरमनवस्ती) यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सामाजिक उपक्रमात सहभाग असतो. कोरोना काळात गणेश उत्सव साजरा करता आला नाही. परंतु परप्रांतीय आणि भाडेकरू नागरिकांना कोरोना काळात या मंडळाच्या माध्यमातून जीवनाश्यक वस्तू असे तसेच परिसरात फवारणी करून निरजंतूकीकरण यासारख्या समाज उपयोगी कामात पुढाकार करण्यात येतील तरुण मंडळाच्या कार्यकर्ते अग्रभागी होते.

यावर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबर आरोग्य व्यवस्थेतील रक्त पुरवठा कमतरता यांची जाणीव म्हणून या मंडळाच्या माध्यमातून रक्तदान हेच श्रेष्ठ दान ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या बैठक संपन्न झाली एक मुखाने रक्तदान शिबीर आयोजन करण्याचे निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मंडळाचे जेष्ठ सल्लागर स्व ह भ प यशवंत दरेकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी तरुणाई बरोबरच वृद्ध, महिलांनी सहभाग घेत शंभर पिशवी रक्तदान एक आर्दश ठेवला.यावेळी रक्तदात्त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यासाठी ओम ब्लड बँक मंगळवार पेठ यांच्या सहकार्याने डॉ. पांढरे, डॉ. सभा मॅडम, शामल मॅडम,उषा मॅडम, अक्षय सर,रोहित सर यांनी कामकाज पाहिले

रक्तदान करणाऱ्या ओम ब्लड सेंटरच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

यासाठी मंडळाचे सल्लागार माजी उपसरपंच राहुल दरेकर, मंडळाचे अध्यक्ष सोसायटी स्वीकृत संचालक काळूराम दरेकर,उपाध्यक्ष दत्ता दरेकर,गणेश दरेकर,धनंजय दरेकर, हनुमंत दरेकर,विजय दरेकर,अमोल दरेकर सुभाष दरेकर,संकेत धुमाळ, शिवम साठे यांच्या सह इतर मंडळाचे कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here