सणसवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती, शेतीमाल, संसार उपयोगी वस्तूचे मोठ्याप्रमाणात नुकसान

0
1002

सणसवाडी

शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे परिणाम समोर आले आहे.सणसवाडी गावाच्या शेतमालाचा आणि शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतजमिन गेली वाहून

सणसवाडी मध्ये काल झालेल्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. मोलमजुरी करून खाणाऱ्या कामगाराच्या घरात पाणी घुसल्यामुळे संसार उपयोगी वस्तुचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची माणूस हानी झाली नसली तरी मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे या परस्थितीचा आढावा ग्रामपंचायत प्रतिनिधीच्या माध्यमातून घेण्यात असून मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे काही तास उलटून सुद्धा कुठल्याच भागात महसूल विभागाने दखल न घेतल्याने नागरिकांची संतापाची लाट उसळली आहे.

उभ्या बाजरीत पाणी साचल्याने पीक सडून जाण्याची भीती

काही स्थानिक प्रतिनिधीनींकडून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम

काही स्थानिक प्रतिनिधीनीं गुडघ्या भर पाणी म्हणून क्रूर चेष्टा करू नुकसानग्रस्त नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. ही दुर्दैवी घटना समोर आले आहे.ज्या गोष्टीसाठी नागरिकांच्या प्रश्नासाठी आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकांनी संधी देण्याचं काम केलं. अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करण्याऐवजी हातावर हात ठेवून बसण्याचं काम केलं.

मुसळधार पावसाने शेतजमिनीवरील माती गेली वाहून

पावसामुळे ऊस, मूग, तूर,कांदा यासारख्या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. शेतजमिनीवरील माती वाहून गेलं आहे. काही ठिकाणी बांध वाहून गेलं आहे. शेतीसाठी केलेली मेहनत, केलेला खर्च वाया गेला.काही शेतकऱ्याच्या विहिरीत गाळ तर एक विहीर बुजली आहे.

निसर्गाच्या प्रकोपाला कॊण कारणीभूत

सणसवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी घुसण्याला कोन जबाबदारअसा प्रश्न समोर येत आहे. सणसवाडीमध्ये होणाऱ्या शेतीमधील प्लॉटिंग मुळे नैसर्गिक स्रोत नष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागातील महापूर सामोरे जावे लागत आहे. वाढते नागरिकरण सणसवाडीप्रमाणे पंचक्रोशीतील गावांना असा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. भाडेकरूचा संसार उघड्यावर आले. त्यामुळे वेळी बंदोबस्त केला नाही तर अशाप्रकारच्या समस्याना आपल्याला पुढील काळात सामोरे जावा लागणार आहे.

शेतकऱ्याची विहीर बुजली यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here