सणसवाडी परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस ;माजी उपसरपंच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचे प्राण

0
5284

सणसवाडी

सणसवाडी परिसरात ढग फुटी स्वरूपाचा पाऊस झाला असून ओढ्यानाळ्यांना पाण्याचा महापूर आल्यामुळे नागरिकांची पूर्ती ताराबळ उडाली होती.

दिवसभर उकडाने हैराण असणाऱ्या नागरिकांना सायंकाळी साडेचार वाजल्यापासून पाऊसाला सुरुवात झाली असून तब्बल अडीच तास चाललेल्या पावसाने सणसवाडी परिसरात धो-धो धुले असून यामुळे कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली असून ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सणसवाडी गावाचा पुना नगर रोड शी असणारा संपर्क तुटल्या मुळे चार पाच तास नागरिकांना अडकून बसावे लागले यामुळे शाळकरी विद्यार्थी,कामगार त्याचप्रमाणे गावातील नागरिक यांना मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना अडथळा आला होता.

नागरिकांच्या घरात घुसलं पाणी संसार उपयोगी वस्तूची मोठ्याप्रमाणात नुकसान

सणसवाडी गावातील ओढ्याला महापूर आल्यामुळे दोन दुचाकीस्वार यांच्या दोन दुचाकी वाहून गेल्यातर एक सायकल स्वार वाहून जात असल्याचे माजी उपसरपंच सागर दरेकर यांच्या लक्षात आल्यानंतर युवकांच्या मदतीने त्याला वाचवण्यात यश आले असून एक महिला घरच्या ओढीने त्या पाण्यातून वाट शोधत चालली असताना ती पाण्यात वाहून जाताना दिसली. त्या घाबरलेल्या महिलेला युवकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले.पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात घुसलं असून यामुळे संसार उपयोगी वस्तुचं मोठयाप्रमाणात नुकसान झाले रात्र भर जागून पाणी घराबाहेर काढावे लागले आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

सायंकाळच्या सुमारास सुरु झालेल्या पावसामुळे शाळा परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने विध्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत अडकून पडावे लागले. मोठ्याप्रमाण पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.उशिरा पावसानी उसंत घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here