Monday, November 28, 2022
Homeइतरआर्थिकसणसवाडी ग्रामपंचायतीस रमाई आवास योजना ग्रामीण "सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत" तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

सणसवाडी ग्रामपंचायतीस रमाई आवास योजना ग्रामीण “सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” तालुकास्तरीय प्रथम क्रमांक

समाजातल्या वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ग्रामपंचायत बजावत असते, त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला शासनाच्या योजनेचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले.

कोरेगाव भिमा – (दिनांक ११ऑगस्ट )सणसवाडी (ता. शिरूर ) सणसवाडी ग्रामपंचायत सर्वांगीण विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल करत असून याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. महा आवास योजनेचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक सणसवाडी ग्रामपंचायतीस मिळवून  देण्यात ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाचा व आजी माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच मोलाचं योगदान आहे.     

महा आवास योजने अंतर्गत तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सणसवाडी  ग्रामपंचायतीस रमाई आवास योजना ग्रामीण “सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” तालुकास्तरीय प्रथम क्रमांक देत त्यांच्या कामाची शासनाने दखल घेऊन सन्मानित केल्याने सणसवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.   

गावचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यामध्ये वृक्षारोपण , बालकांचे व महिलांचे आरोग्य, लसीकरण, रस्ते बांधणी व पथदिवे, ग्रामस्वच्छता व नागरिकांचे आरोग्य यासाठी मोठ्या प्रमाणावरती काम करण्यासाठी ग्रामस्थ गट तट विसरून नागरिकांच्या सोयीसुविधा यांसाठी एकजीव काम करत असून , गावच्या विकासासाठी एकत्र येत गावाला तालुकास्तरीय पुरस्कार मिळाल्याने ग्रामस्थ समाधानी आहे.     

गावाला रमाई आवास योजनेचा  शासनाने दिलेल्या या प्रथम पुरस्काराने सन्मानित केल्याने  गावचे पुरस्कार मिळवण्यासाठीचे पाहिले “खाते”  उघडले असून भविष्यात राज्य स्तरीय पुरस्कार मिळवण्यासाठी हे नक्कीच प्रेरणादायी ठरेल.   

ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासनाचा महा आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या कार्याबद्दल सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येत आहे.महा आवास अभियान २०२०-२०२१ चा रमाई आवास योजनेचा तालुका स्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्रथम क्रमांक ग्रामपंचायत सणसवाडीला तालुक्याचे आमदार अशोक पवार यांचा हस्ते देण्यात आला .

महाराष्ट्र शासनाचा रमाई आवास योजनेचा तालुकास्तरीय  प्रथम पुरस्कार प्रसंगी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सरपंच सुनंदा दरेकर
शासनाने आमच्या गावच्या कामगिरीची दखल घेऊन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आमच्या ग्राम पंचायतीला देऊन सन्मानित केले त्याबद्दल आम्ही निवड समिती व शासनाचे ,मार्गदर्शक यांचे आभारी असून यापुढेही सणसवाडी गावचा विकास हा नेत्रदीपक करणार .             सुनंदा  दरेकर (सरपंच सणसवाडी ग्रामपंचायत )

पुरस्कार प्रदान करताना आमदार अशोक पवार, विजयसिंह नलावडे गट विकास अधिकारी ,रवी काळे अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  , गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे,लालासाहेब जंजिरे  विस्तार अधिकारी सांख्यिकी, विकास शिवले,माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर  ,सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर  ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, स्नेहल भुजबळ ग्रामपंचायत सदस्य,आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मान चिन्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!