सणसवाडी गावातील हरहुन्नरी कलाकारी व्यक्तिमत्व हरपले

0
1357

युवा वर्गात शोककळा पसरली

सणसवाडी

सणसवाडी (ता.२७) गावातील युवा उद्योजक कै. श्री अमोल निवृत्ती दरेकर यांच वयाच्या ३६ वर्षी अल्पशा आजाराने निधन.

सणसवाडी येथील माध्यमिक विद्यालय येथे दहावी शिक्षण घेत वाघोली या ठिकाणी पदवी पर्यत शिक्षण घेऊन बांधकाम क्षेत्रात इंटिरियर डिजाईनर म्हणून स्वतःचा उदयोग सुरु केला होता. जीवनात काहीतरी वेगळ करण्याची पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे त्यांनी नेहमी वेगळं वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील,भाऊ,दोन बहीण, वाहिनी, पुतणे अशा परिवार असून नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव व संचालक श्री. निवृत्ती बाबुराव दरेकर यांचे ते चिरंजीव तर सणसवाडीतील उद्योजक योगेश दरेकर यांचे ते भाऊ होते.त्यांच्या जाण्याने सणसवाडी परिसरात शोककला पसरली असून युवा वर्गातील सर्वांचा लाडके मितभाषी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व अशी त्याची ओळख होती. काही दिवसापूर्वी अल्पशा आजारामुळे त्यांना पुण्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. औषधांना शरीर प्रतिसाद मिळत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगितले. त्याची आज प्राण ज्योत मालवली असून त्यांचा अंत्यविधी आज सणसवाडी येथील स्मशान भूमी येथे होणार आहे. सणसवाडी गावातील मितभाषी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपल्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या चिरंतर आत्मास सदगती लाभो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here