सणसवाडीत ‘स्वराज्य महोत्सवां’तर्गत राष्ट्रगीत समूहगान उपक्रम

0
207

सणसवाडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी (ता.१७) सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम राबवण्यात आला . राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘ सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमा’त सहभागी व्हावे , असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘ स्वराज्य महोत्सव ‘ सुरू असून , या महोत्सवाअंतर्गतच ,सणसवाडीत सामूहिक राष्ट्रगीत गायन हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आला. यावेळी गावातील स्थानिक प्रतिनिधी, अंगणवाड्यातील कर्मचारी , शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी,खासगी शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी , व्यापारी , सेवा पुरवठादार , शेतकरी , महिला , युवक , ज्येष्ठ नागरिक तसेच गावातील इतर सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला . नागरिकांनी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे , असेही सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी आवाहन केले.

” देशभक्ती , देशप्रेम आणि आपली उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम शासनाच्या वतीने राबवत आहेत . नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना असायलाच हावी , त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर एक वेगळा संदेश या माध्यमातून देऊ शकतो.”

संगीता नवनाथ हरगुडे ( सरपंच,सणसवाडी ग्रामपंचायत )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here