सणसवाडी दि. ५ ( वा .) शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजीत शिरूर तालुका प्रिमीअर लिगचे भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आज उद्योजक राजेंद्र सातव पाटील, सभापती मोनिका नवनाथ हरगुडे , उप सभापती सविता पऱ्हा ड , सरपंच सुनंदा दरेकर , उपसरपंच सागर दरेकर व उपस्थीत मान्यवरांचे हस्ते करणेत आले .

यावेळी उपस्थीत १६ संघाचे संघ मालक खेळाडू उपस्थित होते . सणसवाडीचे प्रख्यात उद्योजक सोमनाथ दरेकर यांनी जिल्ह्यात कोठेही नसेल असे भव्य सनग्लो मैदान ५ कोटींवर रकमेचे क्रिकेट प्रेमींसाठी बनवून एक वेगळींच भेट दिल्याचे सरपंच सुनंदा दरेकर यांनी उल्लेखीले . पहिला सामना डिंग्रजवाडी व तांदळीचा अटीतटीचा होऊन २ चेंडू राखून हा सामना तांदळी संघाने जिंकला .
ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाच कोटी खर्च करून मी माझ्यातील क्रिकेटर जागा केला मला क्रिकेटची आवड आणि वनराई ची आवड असल्यामुळे 3000 जंगली झाडांचे वृक्षारोपण करत स्वखर्चातून त्याची निगा व राखण करण्याचे काम संग्लो प्रॉपर्टी च्या माध्यमातून करत आहे -सोमनाथ दरेकर ( उद्योजक संनग्लो प्रॉपर्टी )
या स्पर्धेत रांजणगाव गणपती , कोरेगाव भिमा , मलठण, वाडगाव , कासारी, केंदूर, पिंपरखेड, वाजेवाडी , जातेगाव बु ॥ शिरूर, आण्णापुर, धानोरे, तांदळी, सणसवाडी , डिंग्रजवाडी आदी शिरूर तालुक्यातील नामवंत १६ संघानी सहभाग नोंदवला असून ४ दिवस चालणाऱ्या या सामन्यांचे बक्षीस वितरण आ . अशोक पवार , बाबुरावजी पाचर्णे व मान्य वरांचे हस्ते होणार आहे .
औद्योगिक नगरी म्हणून ख्याती असलेल्या सणस वाडीची आता या भव्य सनग्लो क्रिकेट मैदानामुळे क्रिकेट नगरी म्हणूनही ख्याती होईल अशी प्रतिक्रियाउद्योग आघाडीचे जयेश शिंदे , राहूल गवारे आदींनी व्यक्त केल्या .