Friday, October 7, 2022
HomeइतरUncategorizedसणसवाडीत महाशिवरात्रीनिमित्ताने भव्य बैलगाडा शर्यत - घाटात झाली उचल की टाक .....

सणसवाडीत महाशिवरात्रीनिमित्ताने भव्य बैलगाडा शर्यत – घाटात झाली उचल की टाक .. भिर्ररर बारी

महाशिवरात्रीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या पुढाकाराने तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

सणसवाडी दि . १ ( वा .) सणसवाडी ता . शिरूर येथे महाशिवरात्रीनिमित्त शासकीय नियमांचे पालन करत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणेत येवून एकूण ३२५००० रुपये बक्षीसांची खैरात झाली . बऱ्याच वर्षानंतर शासनाकडून बैलगाड्यास परवानगी मिळाल्याने उत्फूर्त प्रतिसाद व उत्साह होता . याकामी गाडामालक काळुराम बापुराव दरेकर, कैलास विनायक दरेकर , अमोल व सागर काळुराम हरगुडे, चेअरमन शरद दरेकर, रमेश सितारा म दरेकर, हिरामण दरेकर, संतोष किसन हरगुडे , गणेश बबन दरेकर ,भिमसेन दरेकर, पप्पु मिडगुले, लक्ष्मण दरेकर व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले .

शर्यतीत ‘ एकूण १९०बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला . पहिल्या क्रमांकास ८१ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकास ७५हजार रुपये , तिसऱ्या क्रमांकास ५१ हजार रुपये, ४थ्या क्रमांकास ,३१ हजार रुपये व फळीफोड पहिल्या ३ नंबरला अनुकमे २१ हजार , १५ हजार व ११ हजार आणी घाटाचे राजास ७००१ व ट्राफी असा इनाम ठेवण्यात आला होता . आलेल्या प्रत्येक गाड्यास सरपंच राजेश भुजबळ यांचे ५०० रुपये बक्षीस दिले .सध्या बैलगाडा शर्यतीचे फारच आकर्षण असलेने नरेश्वर मंदिर परीसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गाडा शौकीन उलटले होते . प्रथम क्रमांक विशाल नारायण बांगर , केसनंद ‘ द्वितीय भाऊसो टुले – पेरणे, ३रा रमेश जगताप – पिंपळे आणी फळीफोड मा.सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांचा आला . फायनल १ नं . सागर क्षीरसागर – जातेगाव, २ नं . साहेबराव ढोकरे – धानोरे , ३ नं . विशाल बांगर व घाटाचा राजा साहेबराव ढोकरे ठरला . सरपंच व मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करणेत आले .

सुत्रसंचलन अमोल दरेकर , स्वागत अनिल दरेकर , आभार दत्ता हरगुडे यांनी मानले . पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतकरी व अधिकाऱ्यांनी भेट देवून मार्गदर्शन करत चोख बंदोबस्त ठेवला होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!