शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाने निधन

0
214

मुबंई

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्यावर ता.१३जुलै रोजी संध्याकाळी सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यापूर्वी दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या कालावधीत पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे.

मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले.त्यांच्या अंत्यसंस्काराला शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here