Monday, November 28, 2022
Homeअहमदनगरशिरूर तालुक्यातील प्रगतिशील गाव डिंग्रजवाडी हे गावच खूप भारी

शिरूर तालुक्यातील प्रगतिशील गाव डिंग्रजवाडी हे गावच खूप भारी

सणसवाडी

पीएमआरडीए च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे यांनी नवा इतिहास विजय संपादन केला.

डिंग्रजवाडी (ता.शिरूर)नुकत्याच पार पडलेल्या पीएमआरडीए च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे यांनी नवा इतिहास रचत विजय संपादन केला. डिंग्रजवाडी हे साधारणतः सोळाशे लोकसंख्येचे व तीनशे ते साडेतीनशे कुटुंबाचं .शेतीप्रधान गाव आहे पण या गावाचं एक वैशिष्ट्य आहे गावच्या विकासासाठी सर्व गाव एकत्र येते व “आम्हा सर्वांची एकी आणखी खूप काम बाकी “असे म्हणतात वैचारिक मतभेद पक्ष राजकारण किंवा इतर कुठलाही मतभेद सोडून देत गावच्या विकासासाठी व प्रगतीसाठी एकत्र येतात या गावची खालील प्रमाणे काही वैशिष्ट्ये आहे

१) एकत्रित कुटुंबाची परंपरा असलेलं वरिष्ठांचा सन्मान राखणारी कुटुंब व्यवस्था असणारे गाव -डिंग्रजवाडी गावामध्ये एकत्रित कुटुंबव्यवस्थेची परंपरा असून येथे ज्येष्ठांचा आदर व तरूणाईच्या कष्टाची कदर केली जाते कुटुंबातील सर्वजण एकमेकांचा आदर करत एकमेकांच्या विचारांचा सन्मान राखत एकत्रित प्रगती करतात एकत्रित कुटुंब असल्यामुळे उत्पन्न मोठे असते शेतीचे, दुधाचे व इतर पूरक जोडधंद्यांचे येणारे शाश्वत उत्पन्न मिळत असल्याने कुटुंबाच्या प्रगतीची दिशा ठरलेली असल्यामुळे मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये शिकवणे घडवणे व उद्योजकतेचा मूलमंत्र देत व भांडवल देत तरुणांच्या उद्योग व्यवसायाला पाठबळ देत गगन भरारी घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात.

२) पवन चक्की व सौर ऊर्जा यावर ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळा विद्युतीकरण करणार एकमेव गाव ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वाचनालय याठिकाणी विजेची कमतरता व समस्या भासू नये यासाठी ज्येष्ठ नेते आबासाहेब गव्हाणे, माजी सरपंच राहुल गव्हाणे, सरपंच यशवंत गव्हाणे,माजी उपसरपंच मधूकर गव्हाणे, ज्येष्ठ मार्गदर्शक तरुण सहकारी यांच्या एक विचाराने पवनचक्की व सौर ऊर्जा यावर आधारित ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळा विद्युतीकरण करणार एकमेव गाव ठरले आहे.

३)धाडसी ,जिगरबाज व कष्टाळू शेतकऱ्यांचे गाव -डिंग्रजवाडी गावात शेती व्यवसाय मोठ्यावरती केला जातो . शेती बरोबर येथे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो . शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे विक्रमी उत्पादन काढणे एकमेकांना त्याची माहिती देणे उसाच्या उत्पन्नात एकमेकांशी स्पर्धा करणे डिंग्रजवाडी मध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान व दरारा असतो. येथील तरुणांना शेती कसणे त्यात विविध पिके घेणे व त्यातून भरघोस उत्पन्न मिळवणे हा जणू काही जीवन मंत्र बनला आहे.उसाचे व दुधाचे विक्रमी उत्पन्न त्यासाठी लागेल ते कष्ट करण्याची तयारी असणारी तरुणाई व आजोबा,मुलगा ,नातू एका गोठ्यात किंवा शेतात काम करताना दिसणारे गाव.

४) प्लॉटिंग विरहीत गाव – डिंग्रजवाडी हे एकमेव गाव आहे की ज्या गावांमध्ये प्लॉटिंग करण्यात येत नाही येथील शेतकरी शेती कसण्यासाठी जिवाचं रान करतात पण मौजमजा किंवा भपकेबाज आयुष्यासाठी इथे शेती विकली जात नाही तसे करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही व असे जर निदर्शनास आले तर सर्वजण त्याला समजावून सांगतात व त्या विचारांपासून परावृत्त करतात. शेती विकणे किंवा प्लॉटिंग करणे हे या गावात अपमानास्पद समजले जाते. रक्ताचे पाणी करत प्रचंड मेहनतीच्या व घामाच्या धारांचे अर्घ्यदान करत शेतीला आई समजून सेवा करणे हे भाग्याचे व अभिमानास्पद समजले जाते.

नव उद्योजकांचे व निर्व्यसनी तरुणांचे गाव -तरुणाईला शेती कसण्याचे व पिळदार ,बलदंड शरीर बनवण्याचे वेड आहे.घरीच मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे दुधदुभते, शेतातील अस्सल वान, लहानपणापासून शेतीमुळे कष्टाची सवय यामुळे पिळदार अंगकाठी असणारे तरुणाईचे गाव अशी ओळख आहे.डिंग्रजवाडी गावाची आणखी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यकल्याण मुंबई गावातील 90 ते 95 टक्के घरापर्यंत बंदिस्त गटार लाईन व्यवस्था करण्यात आली आहे सध्या या गावांमध्ये वाबळेवाडी च्या धर्तीवर आधुनिक व आई एस ओ दर्जाची व झिरो एनर्जी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी अंगणवाडी बनवण्याचे कार्य लोकवर्गणी व सीएसआर फंडातून सुरू आहे त्याच बरोबर गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सौर ऊर्जा प्रकल्प साठी शंभर एकर जागेची मागणी प्रस्ताव पाठवला आहे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.एकत्रित वृक्षारोपणाचे महत्वपूर्ण व पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला आहे एक दिवस गावासाठी श्रमदान या अभिनव संकल्पनेने गावातील आबालवृद्ध एकत्र येत वृक्षारोपणासाठी काम करतात. उद्योजक , व्यवसायिक ,कष्टकरी व नोकरदारांचे गाव या गावातील प्रत्येक कृतीवर विचारांचा प्रभाव असणारे ,बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे कृतिक्त व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आबासाहेब गव्हाणे यांचे अमूल्य मार्गदर्शन ,माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक राहुल गव्हाणे यांनी गावात उद्योग विश्वाचे दरवाजे तरुणांना उघडे करून दिले.तरुणपणात उद्योग व्यवसाय, नोकरी कामधंदा करत व्यवसाय कसा उभारायचा ,कोणत्या क्षेत्रात संधी आहे हे अचूक हेरत त्या तरूनातील सुप्त गुण ओळखत उदयोजक होण्यासाठी प्रोत्साहन देत ,प्रसंगी आवश्यक ती मदत करत गावातील तरुणांना उद्योजकतेचे धडे गिरवले त्याला योग्य अशी साथ विद्यमान सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे व तरुण सहकारी ,ज्येष्ठ मार्गदर्शकांचे दिल्याने हे गाव उद्योजकांचे गाव म्हणून नावारूपास येत आहे. शासकीय अधिकारी तुषार गव्हाणे, बँक अधिकारी श्री अवधूत गव्हाणे , वकील ॲड सचिन गव्हाणे, डॉक्टर, सोमनाथ गव्हाणे ,पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर विमल गव्हाणे,उद्योजक विकास शामराव गव्हाणे,नामांकित पैलवान , बालाजी गव्हाणे , अविनाश गव्हाणे , भाऊसाहेब गव्हाणे पोपटराव गव्हाणे ,भानुदास नाबगे. प्रसिद्ध दूध व्यावसायिक , श्रीहरी डेरीचे , दत्तात्रय गव्हाणे, सोनबा गव्हाणे. ज्ञानेश्वरी डेअरी चे , प्रकाश गव्हाणे , प्रसाद गव्हाणे , माजी उपसरपंच संदीप गव्हाणे असे अनेक छोटे-मोठे दुग्ध दुग्ध व्यावसायिक आहेत ते रवींद्र गव्हाणे , संभाजी गव्हाणे,बाळासाहेब गव्हाणे दत्तात्रय गव्हाणे,सदानंद गव्हाणे,खंडू गव्हाणे,राहुल गव्हाणे ,गोपीनाथ गव्हाणे, रमेश गव्हाणे असे विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे शासकीय नोकरदार, वैद्यकीय सेवक उद्योजक व्यावसायिक यामुळे या गावाला उद्योजिकतेचा वसा लाभला आहे

… शब्दांकन उदयकांत ब्राम्हणे(प्राध्यापक )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!