शिक्रापूर पोलिसांची कारवाई दहशत आणि खंडणी मागणाऱ्या आरोपी वैभव आदक विरुद्ध गुन्हा दाखल

0
1370

शिक्रापूर प्रतिनिधी

काही दिवसापूर्वी शिक्रापूर पोलिसांनी दहशत करणाऱ्या आरोपी वैभव आदक याला अटक केल्यानंतर त्यांच्या विरोधात कोणाची काही तक्रार असेल तर शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कळवावे असे आवाहन करण्यात आल्या नंतर गेले दोन दिवसापासून आरोपी वैभव आदक याने खंडणी किंवा दमदाटी केली असेल गुन्हा दाखल होऊ लागला आहे.

संदीप मारूती पाटील, (वय 47 वर्ष, व्यवसाय – नोकरी (अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि.पुणे.),रा.वैदही सोसायटी,एम.आय.टी कॉलेज रोड कोथरूड पुणे.) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी -1)  वैभव संभाजी आदक (रा.अष्टापुर ता.हवेली जि.पुणे.हल्ली रा.शिक्रापुर ता.शिरूर जि.पुणे.) 2) अनिकेत पोपट ढोकले, 3) आनंद पंडीत कसबे  (दोघे रा.करंदी ता.शिरूर जि.पुणे.,) 4)  संदेश कोतवाल (रा.अष्टापुर ता.हवेली जि.पुणे ) 21/02/2021 पासुन दि 28/6/2021रोजी वेळोवेळी पर्यंत अल्कोमेक्स स्प्रिंगस प्रा.लि.तळेगाव ढमढेरे ता.शिरूर जि.पुणे. तळेगाव ढमढेरे येथे सणसवाडी रोड येथे यातील आरोपी यांनी फिर्यादी यास कंपनीत कॉन्ट्रॅक्ट दे किंवा महिन्याला खंडणी दे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण व शिवीगाळ केली तसेच वेळोवेळी पाटलाग करून गाडी आडवी लावून पिस्तुलाचा धाक दाखवून आपल्या साथीदारांसह शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली.या गुन्ह्यातील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर करत आहे.

” बकरी ईद ” मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने साजरी करावी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर

संघटित गुन्हेगारी च्या माध्यमातून औद्योगिक परिसरात दहशत किंवा खंडणी मागणाऱ्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन कडक पावले उचलत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात काही तक्रार असेल तर शिक्रापूर पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचं आव्हान यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केली आहे.

कोरेगाव-भीमा परिसरात प्लास्टिकसह कचऱ्याचे साम्राज्य; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपळे जगताप ता.शिरूर जि.पुणे गावच्या हददीतील एका कंपनी मध्ये फिर्यादी कामानिमित्त आला असताना आरोपी वैभव संभाजी आदक रा.शिक्रापूर ता. शिरूर जि.पुणे याने मोबाईल वरून मला फोन करून तुला इथून पाठीमागे पण कित्येक वेळा सांगितले आहे की, तु मला तुझ्या काँन्ट्रॅक्टमध्ये पार्टनर म्हणून घे. नाहीतर वैभव आदक गॅंगला महिन्याला 50 हजार रूपये हप्ता दयावा लागेल अशी पैशाचे रूपामध्ये खंडणीची मागणी करून तू जर मला व माझ्या गॅंगला महिन्याला हप्ता दिला नाही तर पिंपळे जगताप येथील कंपनीत कसा येतो तेच पाहतो. नाहीतर तुझी गाडी जाळून टाकून तुझ्या लोकांना मारहाण करून तुला जीवे मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.  

सदर घटनेचा तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पानसरे करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here