विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडविणारा शिक्षणाचा वारकरी शिक्षक….. डॉ. मकरंद वझल

0
184

शिरूर प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर शिक्षण घेताना विद्यार्थी आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर असतो याचं काळात विद्यार्थी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करतो म्हणूनच शिक्षक त्याचे व्यक्तिमत्त्व घडविणारा वारकरी असल्याचे मत पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषद व सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सन्मान समारंभात केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा .सतीश शिर्के होते. कार्यक्रमाला राज्यसहसचिव प्रा जितेंद्रकुमार थिटे, उपप्राचार्या डाॅ. विजया एस. नवले. अभ्यास मंडळाच्या सदस्या सुरेखा दौंडे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा अविनाश शेलार हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा. विठ्ठल दौंडकर उपस्थित होते याप्रसंगी बोलताना अभ्यास मंडळाच्या सदस्या प्रा.सुरेखा दौंडे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी अकरावी पासूनच करण्याची गरज आहे त्यासाठी भूगोलाच्या माध्यमातून संपूर्ण जग पुस्तकातून उत्साहाने फिरले पाहिजे आधुनिक जीवनशैलीमुळे शिक्षण प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून विद्यादानांच पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांनी भविष्यात येणारे धोके ओळखून त्यासाठी भूगोल परीषदेच्याद्वारे उपाययोजना कराव्यात असे उपप्राचार्या डाॅ विजया एस. नवले यांनी सांगितले भूगोलाचा शिक्षक हा बहुआयामी तसेच कनिष्ठ महाविद्यालयात वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असल्याचे परीषदेचे राज्यसहसचिव प्रा.जितेंद्रकुमार थिटे यांनी सांगितले या कार्यक्रमादरम्यान आपल्या उत्कृष्ट. कार्याबद्दल प्रा.सुरेखा दौंडे यांना परिषदेच्या वतीने भूगोलरत्न देऊन सन्मानित करण्यात आले तर ९९ गुण मिळवलेल्या वैष्णवी सदानंद वाजे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा.बाळासाहेब वाबळे,प्रा.रूपाली चव्हाण यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला भूगोल विषयात ९५ पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचाही सत्कार परिषदेच्या वतीने केला .

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परीषदेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सोहळा, भूगोल शिक्षक संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, भूगोल दिन, विज्ञान प्रदर्शनाच्या धर्तीवर भूगोल प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.अविनाश शेलार यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्याध्यक्ष प्रा सतिष शिर्के म्हणाले की पुण्यात आयोजित हा उपक्रम पथदर्शी असून संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे जिल्हावार कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करणार असून भूगोल विषयाकडे जास्तीत जास्त विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी भूगोल परीषदेच्याद्वारे राज्यभर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसिद्ध गायक प्रा हरिश्चंद्र शरणागत,प्रा. अर्जुन आवारी,प्रा रत्नप्रभा देशमुख,प्रा.हनुमंत तुपेरे,प्रा.रणजित ढवळे,प्रा सुदाम गारगोटे,प्रा.किर्ति पेशवे, हरिश्चंद्र उबाळे,प्रा.संध्या गोरे,प्रा.वैजंयती गंधारे,प्रा.अमितकुमार धुमाळ प्रा.राजेंद्र होले यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मंगेश महाजन यांनी तर आभार प्रा.विभा आबनावे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here