वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियमाक मंडळाच्या संचालक पदी आमदार अशोक पवार यांची बिनविरोध निवड

0
620

वाघोली प्रतिनिधी

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन व साखर उद्योगास तांत्रिक मार्गदर्शन करणारी आंतराष्ट्रीय संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियमाक मंडळाच्या मतदार संघ क्र.४मधून आमदार अशोक पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे (Vasant dada sugar institute Pune) या संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच होत मतदार संघ क्र.४ मधून आमदार अशोक पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे महासंचालक तथा निवडणूक समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी केली

शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदार अशोक (MAL Ashok Pawar ) यांचे सहकारी साखर कारखाना उद्योगातील आदर्शवत कामकाज बघून त्याची निवड झाली आहे.

त्या पाठोपाठ अंतराष्ट्रीय संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या निवडीचे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदींनी अभिनंदन केले.

   साखर उत्पादन, साखर उद्योगासमोरील समस्या, साखरेची विक्री, साखर कारखान्यांच्या उत्पादन वाढ, कारखान्यांच्याबाबत उत्पन्न वाढ,सोलर पॅनेल उभारण्याची प्रकल्प,साखर कारखान्यांमध्ये प्रेसमड निघतं त्यापासून सीएनजी गॅस निर्मितीबाबत,को-जनरेशन प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती, डिस्टलरी प्रकल्प, इथेनॉल तयार करण्यात येऊ लागलं. ही इंडस्टी टिकावी आणि शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावेत, या सारख्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी केंद्र मानून त्याचं उत्पाद
न दुप्पट करण्याचा मानस ठेवून करणार असून काम करणार आहे. 
    अशोक पवार (आमदार,शिरूर हवेली विधानसभा )      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here