Monday, August 15, 2022
Homeइतरआर्थिकलग्नात सुनेचे रजिस्टर हक्कसोड भाऊ व्यंकट नवले यांना देत संपत्तिपेक्षा  नाती महत्त्वाची...

लग्नात सुनेचे रजिस्टर हक्कसोड भाऊ व्यंकट नवले यांना देत संपत्तिपेक्षा  नाती महत्त्वाची या भूमिकेतून ठेवला कंद परिवाराचा आर्दश

पैशामुळे दुरावत चालली नाती आणि यामुळे दुरावत झालेले संस्कार ही संस्कृती आणि समाजव्यवस्थेला खिळ बसवणारी गोष्ट त्यामुळे समाज जीवनात काम करत असताना आदर्शवत विचार मनात येऊन गेला आणि या गोष्टीसाठी मला हे करावं वाटलं असे माजी उपसरपंच संजय कंद हे यांनी सांगितलं

सुनेचे रजिस्टर हक्कसोड भाऊ व्यंकट नवले यांना देत संपत्तिपेक्षा नाती महत्त्वाची आहे हे कृतीयुकत समाजासमोर ठेवताना कंद कुटुंबीय व मान्यवर

सणसवाडी – प्रतिनिधी

सणसवाडी ( ता.शिरूर)प्रत्येक कुटुंबात विवाह हा अनोखा सोहळा असतो.त्याला अविस्मरणीय करण्यासाठी कोणी हेलिकॉप्टरमधून वधुवर आणतात,कोणी वधूला बुलेट वरून आणतात तर कोणी भव्यदिव्य  डेकोरेशन , शाही भोजन, शाही विवाह सोहळा करून कोट्यावधी रुपये खर्च करतात.
     या सगळ्याला अपवाद आहे लोणीकंद येथील संस्कारशिल कंद कुटुंबीय. लग्नात शाही डेकोरेशन करण्यापेक्षा गावातील शाळेच्या वर्गखोल्या बांधूयात यातून उद्याचे भविष्य घडेल, आदर्श नागरिक निर्माण होईल , हे एक राष्ट्रकार्य आहे आणि त्यात माझ्या कुटुंबाचे योगदान राहणारच या पवित्र सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेनेडाॅ बसु विद्याधाम प्रशालेच्या नविन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ५१००० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देत  नवीन नाती व परंपरा जपत समाजाला दिशा देणारे लोणीकंद गावचे मा उपसरपंच व मा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय सोपान कंद यांच्यासह कुटुंबीयांनी केला
   भारतीय संस्कृतीत विवाहाचे अत्यंत महत्व असून हा एक विवाह संस्कार मानला जातो. विवाहामुळे दोन घराणी एकत्र येत नवीन नाते संबंध निर्माण होऊन जीवनाची नावीन्यपूर्ण सुरुवात होत असते. आपल्या संस्कृतीला, मानवतेला गर्व वाटावा असा आदर्श आणि अविस्मरणीय विवाह सोहळा लोणीकंद येथील कंद कुटुंबीयांनी साजरा केला आहे .
        समाजजीवन अधिक सुखी, समृद्ध, समाधानी व्हावे विविध क्षेत्रातील प्रतिभावान व्यक्ती कार्यरत असतात. समाजामध्ये परोपकारी, निष्काम कार्य करणारी मंडळी असतात, तेव्हा तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असतो.  प्रदिपदादा विद्याधर कंद मा अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद गावामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना मा. उपसरपंच संजयभाऊ कंद यांनी वेळोवेळी राजकीय सामाजिक कौटुंबिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन आपल्या कार्याचा एक  वेगळा ठसा उमटवला आहे.
      हाच आदर्श कृतीतून दाखवत २ जुलै रोजी संजयभाऊ कंद यांच्या मुलाचा शुभविवाह कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोजक्या आप्तेष्टांसह पार पडला.
     यावेळी मुलाच्या लग्नाच्या शुभकार्यानिमित्त आपल्या कुटुंबातील आनंदसोहळ्यात  कुटुंबाबरोबर आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवत समाज सेवी भावनेने कार्यरत राहून समाजासमोर एक कृतियुकत आदर्श समाजासमोर ठेवला असून हा अनोखा आदर्श समाजाला अनुभवायला मिळाला. संजय कंद ,उपसरपंच शैलजा कंद व उद्योजक नितीन कंद यांनी शुभकार्यानिमित्त डाॅ बसु विद्याधाम प्रशालेच्या नविन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ५१००० हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक शांतीलाल ब्राम्हणे सर व संत विचार प्रसार केंद्र प्रमुख आदरणीय उत्तमराव भोंडवे यांच्याकडे वडगाव रासाई चे सरपंच सचिन शेलार यांच्या शुभहस्ते सपुर्त केला. यातून आपण आज जे काही आहोत त्यामागे शाळेचे मोठे योगदान आहे आज खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची फी भरता भरता पालक मोडकळीस आलेत आणि आपल्याला उभे करणाऱ्या शाळेला आपण आता दिमाखदार , आधुनिक व भव्य स्वरूपात उभे केले पाहिजे ही जाणीव ठेवत कंद कुटुंबीयांनी शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी मोठे योगदान दिले आहे .
कौटुंबिक जिव्हाळ्यातील समाधान देणारा महत्वाचा घटक म्हणजे नातीगोती. ही नाती जपण्यासाठी दोन्ही बाजुंनी निस्वार्थपणे आपुलकीच्या भावनेने प्रत्येक लहानसहान गोष्टींमध्ये आपलेपणाने प्रयत्न आवश्यक असतात. ही कौटुंबिक सामाजिक जबाबदारी मानत समाजाला दिशा देण्यासाठी आपण स्वतःच्या कुटुंबापासून सुरवात केली पाहिजे. याच अनुषंगाने मा उपसरपंच संजयभाऊ कंद यांनी मुलांच्या शुभकार्यानिमित्ताने लक्ष्मीच्या पावलांनी दुस-या घरची मुलगी सुन म्हणून आपल्या कुटुंबात येत आहे. अशा कौटुंबिक आनंदसोहळ्यात आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या सुनेकडून भाऊ व्यकंट नवले याला लग्नाच्या बोहल्यावरच व-हाडी मंडळींच्या साक्षीने व आदरणीय प्रदिपदादा विद्याधर कंद मा अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे नारायणराव कंद मा उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली उत्तमराव भोंडवे संस्थापक संत विचार प्रसार केंद्र प्रमुख मा पंचायत समिती सदस्य सुरेश सातव सोमेश्वर पतसंस्थेचे मा चेअरमन जनार्दन  वाळुंज भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सोसायटी चे चेअरमन रघुनाथ कंद मा उपसरपंच भानुदास साकोरे सामाजिक कार्यकर्ते सोपान कंद यांच्या शुभहस्ते रजिस्टर हक्कसोडपत्रक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्याचा अनोखा व महाराष्ट्रात  पहिल्यांदाच कार्यक्रम उपस्थितांनी अनुभवला.
मोठ्या प्रमाणात होणारे औयोगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडतील असताना , रक्ताची नाते निबंधक कार्यालयात तुटल्याची उदाहरणे पाहायला मिळतात.तिथे या अनोख्या कृतीतून समाजातील नात्यात अलीकडच्या काळात आलेला दुरावा संपवण्यासाठीचा प्रयत्न स्वतःच्या कुटुंबापासून केल्याबद्दल अनेकांनी संजयभाऊ कंद यांचे कौतुक केले आहे.
       हा अनोखा सोहळा जिल्ह्यामध्ये चर्चेचा व उस्तुकातेचा  विषय झाला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला असून नात्यातील गोडवा आणि जिव्हाळा हा आर्थिक संपत्तीपेक्षा खूप मोठा आहे हे कंद कुटुंबीयांनी कृतीतून दाखवले आहे .


 

विवाह प्रसंगी डॉ बसू विद्याधाम प्रशालेच्या बांधकामासाठी ५१००० हजारांचा धनादेश देताना मान्यवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!