मोबाईल फोन व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड          

0
488

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची धडाकेबाज कारवाई

मुद्देमालासह आरोपींना जेरबंद करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट

शिक्रापूर प्रतिनिधी

शिरूर – हवेली तालुक्यातील औद्योगिक परिसरात मोबाईल फोन व लॅपटॉप यासारख्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडत असल्याच्या अनुसांगाने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये  (ता. १०) मार्च रोजी मयूर रामचंद्र पवार (रा. पाबळ चौक शिक्रापूर) यांनी लेनोवो कंपनीचा लॅपटॉप व रेडमी कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 32000/-रुपये किमतीचा मुद्दे माल चोरी गेल्याची अज्ञान इसमाविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचा  समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे,सहा. फौजदार तुषार पंदारे यासह जनार्दन शेळके, राजू मोमीन,मंगेश थिगळे,योगेश नागरगोजे,सागर कोंढाळकर(शिक्रापूरPS)असे करीत होते .सदर गुन्ह्यचा तपास करीत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम १)सौंदाराजन गोविंदा (वय -20)२)बालाजी सल्लापुरी (वय -23 दोघे रा.उदयराज्यपल्यम पो.थोट्टल्लम ता .अंबूर जि .बेल्लोर राज्य तामिळनाडू हल्ली रा. पेरणे ता. हवेली जि.पुणे )यांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने सदर पथकाने  कोरेगाव भिमा येथे सापळा लावून वर नमूद दोन्ही संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्यांनी वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा ,सणसवाडी ,शिक्रापूर ,रांजणगाव अशा बऱ्याच ठिकाणी मोबाईल  व लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांचेकडे असलेल्या काळे रंगाचे सँक ची पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीचे  ३० मोबाईल दोन लॅपटॉप असा एकूण ३,३८,०००/- रू किंमतीचा माल मिळून आलाआहे.शिक्रापूर,रांजणगाव लोणीकंद  पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध असणाऱया दहा गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

त्याचप्रमाणे सदर आरोपींनी  अश्या प्रकारचे इतर बरेच गुन्हे लोणीकंद, कोरेगाव भिमा,सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव परिसरात केल्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,दौंड  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे,स.फौज तुषार पंदारे,पो.हवा जनार्दन शेळके,पो.हवा राजू मोमीन,पो.ना मंगेश थिगळे,पो.ना योगेश नागरगोजे,पोना सागर कोंढाळकर(शिक्रापूरPS)  यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here