Monday, November 28, 2022
Homeइतरआर्थिकमोटार सायकल चोरी करणा-या चोरास युनिट ६ ने केले जेरबंद

मोटार सायकल चोरी करणा-या चोरास युनिट ६ ने केले जेरबंद

  वाघोली परिसरात १६ जुलै रोजी पो . शि . सचिन पवार यांना  गस्त करत असताना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की , इसम अशोक बळीराम थोरात , (वय २३ वर्षे , व्यवसाय मजूरी , रा . सध्या गणेश काळे यांच्या खोलीत , काळेचा ओढा , वाघोली , ता . हवेली , जि . पुणे , मुळगाव- मु . बाळकृष्णनगर , पो . कुपवाड , ता . मिरज , जि . सांगली )याचेकडे चोरीच्या मोटार सायकली असून तो त्याच्या घराजवळ थांबलेला आहे . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही सदर बाबत  पुणे शहर गुन्हे शाखा , युनिट -६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने ,  यांना कळविले असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून माहितीप्रमाणे नमुद ठिकाणी कारवाई करून आरोपी ताब्यात घेवुन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेतले . त्याच्या घराच्या जवळ नंबर प्लेट नसलेल्या दोन मोटार सायकली मिळून आल्याने त्यास विश्वासात घेवून तपास केला असता त्याने सदरच्या मोटारसायकली हया चोरून आणल्याचे कबूल केल्याने त्यास सीआरपीसी कलम ४१ ( १ ) ( ड ) अन्वये ताब्यात घेण्यात आले . सदर मोटार सायकलीबाबत आधिक तपास करता त्यापैकी २०,००० / – रु किंमतीची होंडा पॅशन प्रो ही मोटारसायकल रांजणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण गु.र.नं. १४८/२०१६ भा.दं.वि.कलम ३७ ९ या गुन्हयातील व २५,००० / – रु किंमतीची बजाज डिस्कव्हर हि मोटारसायकल आष्टी पोलीस स्टेशन जिल्हा बीड गु.र.नं. २१४/२०२१ भा.दं.वि.कलम ३७ ९ या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले . अशा प्रकारे आरोपीकडून एकूण ४५,००० / – रु किंमतीच्या दोन मोटार सायकली ताब्यात घेवून आरोपीस रांजणगाव पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे .            

सदरची कार्यवाही पुणे शहर पोलीस आयुक्त  अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त  डॉ.रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे  श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे २. चे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट , ६ चे पोलीस निरीक्षक  गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , अंमलदार मच्छिंद्र वाळके , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , नितीन मुंढे , प्रतिक लाहिगुडे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश ताकवणे , सचिन पवार , ऋषिकेश टिळेकर , नितीन धाडगे , शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!