मिडगुलवाडीचे दिव्यांग सौरभला नव शिक्षणाची संधी

0
991

कान्हूरच्या दिव्यांग सौरभला नवशिक्षणाची संधी प्राचार्य अनिल शिंदे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश.

सणसवाडी दि १९ ( वा )- ज्ञानेश्वर मिडगुले

सौरभ उर्फ सार्थक शरद पोपळे

सामान्य मुलांच्या शाळेत त्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्याने दिव्यांग मुलांसाठी असलेल्या विशेष शाळेत त्याला प्रवेश देण्यासाठी प्राचार्य अनिल शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले व मिडगुलवाडी येथील गरीब कुटुंबातील दिव्यांग सौरभचा मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत आज प्रवेश घेण्यात आला.

सौरभ उर्फ सार्थक शरद पोपळे हा मिडगुलवाडी येथील दिव्यांग विद्यार्थी आहे.१६ वर्षाच्या सौरभचे कान्हूरच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ९वीच्या वर्गात हजेरीपटावर नाव आहे.मात्र अपंगत्वाची त्रिव्रता जास्त असल्याने तो विद्यालयात येऊ शकत नाही.ही बाब विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच्या पालकांशी संपर्क केला.सौरभला ह्या सामान्य मुलांच्या शाळेत न्याय मिळणार नाही ,त्यासाठी शासनाने दिव्यांग मुलांसाठी सुरू केलेल्या विद्यालयात त्याला प्रवेश घेतला पाहिजे ही बाब प्राचार्यांनी पालकांच्या गळी उतरवली.त्यासाठी ह्या मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुणे येथील संगीता थोरात यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी सुचविल्याप्रणाने राजमाता महिला बहुउद्देशीय संस्था चालवीत असलेल्या मांजरी बुद्रुक येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील मानसशास्त्रज्ञ मेधा शिंदे यांच्याशी प्राचार्य शिंदे यांनी संपर्क केला व सौरभची सर्व माहिती त्यांना दिली.कोरोनाच्या काळात २ वर्षांपासून ह्या शाळा बंद आहेत,तरीही आता शासनाने परवानगी दिल्याने ह्याही शाळा आता सुरू होत आहेत.

आज सौरभचे आईवडील, प्राचार्य शिंदे,सामाजिक कार्यकर्ते अमोल मिडगूले,सुनील जिते यांनी सौरभला घेऊन ही शाळा पाहिली.सौरभला प्रवेश देण्याविषयी चर्चा केली. मानसशास्त्रज्ञ मेधा शिंदे यांनी सेकंडरीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी त्याचा अर्ज भरून घेतला.६ ते १८ वयोगटातील दिव्यांग मुलांना येथे प्रवेश दिला जातो.ह्या मुलांचा राहण्याचा,जेवणाचा,कपड्यांचा सर्व खर्च विनामूल्य आहे.दिव्यांग मुलांसाठी इथे विशेष दखल घेऊन त्यांना हस्तकला,चित्रकला,खेळ,गायन इत्यादी बाबी शिकविल्या जातात.सौरभला आता नवशिक्षणाची संधी मिळाली आहे. नियतीने अन्याय केला म्हणून दिव्यांग मुलांच्या पालकांनी निराश होऊ नये.अशा मुलांसाठी असणाऱ्या शाळेत त्यांना प्रवेश घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे असे आवाहन प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here