Monday, November 28, 2022
Homeइतरटेक्नॉलॉजीमाफी मागा नाहीतर गाल रंगवण्यात येईल : राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली...

माफी मागा नाहीतर गाल रंगवण्यात येईल : राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर

सणसवाडी – सणसवाडी ( ता शिरूर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे  मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी सणसवाडीच्या सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या घरी भेट देत महिलाशी संवाद साधत त्या दरेकरांशी तुमचा काही संबंध नाही असे म्हणतं एक मिस्किल विनोद करत हास्य पिकवले.महिलानी  आपल्या पती राजांना आपल्या कारभारात हस्तक्षेप करू न सल्ला दिला. सर्वांशी मन मोकळा संवाद साधला. महिलांशी संवाद साधत लवकरच बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने समाचार घेतला जाणार असल्याचे सांगितले.त्यानंतर रुपाली चाकणकरांनी  सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ यांच्या घरी भेट देत गणपतीची आरती केली यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आनंद झाला असून रुपाली चाकणकरांच्या सहवासाने भुजबळ कुटुंबात , ग्रामपंचायत  सरपंच ,उपसरपंच सदस्य , यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.  त्यांनी महिलांशी संवाद साधत  सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले.

सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ यांच्या घरी गणेशाची पूजा करताना

रुपाली चाकणकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता  काल झालेल्या शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा  पक्ष या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला 

         विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या  वक्तव्यावरून त्यांचे अभ्यासाशी व वैचारिकतेशी  दूरदूर संबंध दिसत नाही त्यांच्या मनामध्ये जे आहे ते बोलण्यातून दिसून आले. त्यांच्या तोंडातून जी घान टपकत होती त्यावरून भाजपचा विचारांचा वारसा व संस्कृती पाहायला मिळाली.आपल्या बोलण्यातून वैचारिक दरिद्रता दिसून आली.प्रवीण दरेकरांनी समस्त महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचा थोबाड आणि गाल रंगवू शकतो आणि हे थोबाड आणि गाल रंगविण्याची ताकद महाराष्ट्रातील रणरागिनिंच्या मनगटात आहे.
रुपाली चाकणकर(महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पार्टी महाराष्ट्र)

याबरोबरच शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहोत कायदा कठोर आहे ,पोलिसही त्याबाबतीत चांगले काम करतात पण पोलीस आणि कायद्यावर जबाबदारी टाकून आपण हात वर करणार आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत जन्मदाता बाप , भाऊच जर अत्याचार करत असतील तेंव्हा संस्कार जातात कुठे नात्यांची जन राहिली नाही यासाठी कायद्यापेक्षा समाजाची मानसिकता बदलायला हवी. महिलांकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाते तिला त्यासाठी मारले जाते,जाळले जाते तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो, तिची हत्या केली जाते ही मानसिकता माणसांच्या कळपात वावणारी ही हिंस्त्र श्र्वापद आहेत जोपर्यंत यांचा नायनाट होत नाही तोपर्यंत महिला सुरक्षिततेबाबत बोलणे चुकीचे होणार आहे . कायदा ,सुव्यवस्था,प्रशासन व समाज यांनी एकत्र येत काम करायला हवे.वयात येणाऱ्यांच्या मनामध्ये सभोवतालच्या घटनांचा पडसाद उमटतात म्हणून केंद्र सरकारने विकृत दर्शन देणाऱ्या वेब सिरीज, पोर्नोग्राफी यांना तातडीने बंद करून समाजाला दिशा द्याव्यात.

भुजबळ कुटुंबीय आणि पुष्पगुच्छ देऊन प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचा केले स्वागत

चित्रा वाघ यांच्याबाबत बोलताना  ज्यांनी लाचखोरीचा आरोप आणि त्यातून वाचण्यासाठी भाजप मध्ये प्रवेश केला त्यांनी दुसऱ्यांना नैतिकता आणि नीतिमत्ता सुचवू नये. राष्ट्रवादीत असताना भाजप बलात्कारी पक्ष म्हटल्या ,भाजपमध्ये गेल्यावर माहविकास आघाडी पक्ष बलातकाऱ्यांचा पक्ष आहे त्यांनी आपल्या मतावर ठाम असावं जिकड खोबरं तिकडे चांगभलं करू नये आपल्या मतावर ठाम राहावं    

यावेळी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर , उपसरपंच विजयराज दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, ग्रा. पं.सदस्य दत्तात्रय हरगुडेसुवर्णा रामदास दरेकर, शशिकला सातपुते,रुपाली दरेकर, संगीता हर गुडे,स्नेहल भुजबळ, नवनाथ हरगुडे , माजी सरपंच गीता भुजबळ,माजी सदस्य सुनीता दरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!