Monday, August 15, 2022
Homeइतरआरोग्यमद्यपान करून शिक्षक शाळेत हजर....

मद्यपान करून शिक्षक शाळेत हजर….

जगाला दिशा देणारा म्हणून शिक्षकांची ओळख आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील शिक्षकी पेशाला काळिमा फसणारा प्रकार समोर आला आहे. एक शिक्षक मद्यपान करून शाळेत हजर झाला. दारू पिल्यामुळे संबंधित शिक्षकाला नीट बसू शकत नव्हते. बसत असताना ते जमिनीवर कोसळले. ही घटना गावातील तरुणाईला समजल्यानंतर काही तरुणांनी त्यांचे कृत्य आपल्या मोबाईल मध्ये कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .

सध्याचा हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील दापूरे गावात असून ह्या घडलेल्या घटनेचा गावक-यांनी जाहीर निषेध केला आहे. संबंधित शिक्षक दापूरे गावातील शाळेत कार्यरत आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ या उपक्रमाअंतर्गत सिन्नर तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन सुकर होण्यासाठी गृहभेटी उपक्रम सुरू केला आहे गृहभेटी ची शाळा विद्यार्थ्यांना चांगलाच लावत आहे

आणि दुसरीकडे सध्या लाकडाऊन असल्याने शाळा बंद आहे . अशात या शिक्षकाने शाळेलाच आपला दारुचा अड्डा बनवला आहे. संबंधित मद्यधुंद शिक्षकाला आपण कुठे आहोत ? आणि काय करत आहोत याचे देखील भान राहिले नव्हते.गावातील काही नागरिकांनी संबंधित मद्यधुंद शिक्षकाची कानउघडणी केली आहे. पण त्याची नशा उतरेपर्यंत शिक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!