Friday, October 7, 2022
Homeइतरआरोग्यबिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी, परिसरात बिबट्याची भीती

बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी, परिसरात बिबट्याची भीती

मांदळवाडीत बिबट्याचा शेतमजुरावर प्राणघातक हल्ला – पिंजरा लावण्याची मागणी

सणसवाडी दि . १७ ( वा .) शिरूर व आंबेगाव तालुक्याचे सीमेवर डोंगरभागात वसलेल्या मांदळवाडी येथे काल दुपारी मोटार सायकलवर गायी गुरांसाठी शेतात गवत चारा आणायला निघालेल्या शेतमजुरावर उसातून बाहेर येत बिबट्याने हल्ला करून जबर जखमी केल्याने मांदळवाडी सविंदणे डोंगर भागात खळबळ उडाली असून लोकांत भिती पसरली आहे .

जखमी लोमेश चौधरीचे तोंड व इतर शरीरावरील जखमा –(फोटो ज्ञानेश्वर मिडगुले)

दिवसाआड या भागात कुठे ना कुठे बिबट्या दिसत असल्याने वनखात्याने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मांदळवाडी , सविंदणे , घोलपवाडी , कोळेकर व लंघेवस्ती वरील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे .काल दुपारी ४ वा.दरम्यान विठ्ठल गेणूजी ढगे यांचे शेतात काम करणारा लोमेश गुलाबराव चौधरी हा ढगेस्थळ येथील शेतात गायीसाठी गवत आणणेसाठी जाताना रस्त्याकडेच्या उसामधून बिबट्याने अचानक झडप घालून पाडले व तोंड कपाळ डोळ्यांखाली व नाकाला ओरबाडले असता लोमेशने हाताने झिडकारता बिबट्या पळाला व लोमेशला लोणीतील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मंचरचे ग्रामीण उपजिल्हा रुग्नालयात हलविले .

या भागात ४ -५ बिबट्यांचा वावर असून परवाच घोलपवाडी शिवारात फटांगडे दरीत पिकप समोर लाईटला व हॉर्नचे आवाजाला भिवुन पळाल्याची बातमी दिसली . तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा असी मागणी मांदळवाडीचे सरपंच आदक व सविंदणेचे उपसरपंच भाऊसो लंघे यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!