बापाचं ठरला मुलीचा कर्दनकाळ

0
599

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले

सणसवाडी दि . २८ ( वा . ) शिक्रापुर ता शिरूर येथील बजरंगवाडीचे सिद्धीविनायक हॉस्पीटल शेजारून ७वर्षाची मुलगी अपेक्षा युवराज साळुंके ही गायब झाल्याची तक्रार मुलीचे आईने रात्री नोंदवली व ही बातमी सोशल मिडीयाने सगळीकडे पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती . कालं ६वाज ताचे दरम्यान ही मुलगी हायवेलगतच्या आपल्या घरातून बाहेर पडली ते परत आलीच नाही म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनला मुलीचे आईने तक्रार दिल्यावर सर्व पोलीस स्टेशनच युद्धपातळीवर कामाला लागले व सारे पन्नासवर पोलीस रात्रभर परिसरात इकडे तिकडे शोध घेत फिरलेअसता शेवटी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलीचा बाप युवराज साळुंखे हाच मुलीला नदीकडे घेऊन जाताना फूटेजमध्ये दिसला ,तेव्हा पोलिसांनी नदीच्या किनाऱ्यावर सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला ,तेव्हा एका ठिकाणी मुलीच्या चपला आढळल्या पण पाणी जास्त असलेने मृत बॉडी शोधण्यास अवघड जात होते . आणि मग पोलिसांनी मुलीच्या बापाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःच मुलीला वेळ नदीपात्रात पाण्यात फेकून दिल्याचे कबूल केले .शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमनेच कामगिरी बजावली . आधीच सगळीकडे मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवा पसरल्या असल्यामुळे नागरिकांमध्ये जास्तच घबराहट पसरली होती .बापच मुलीचा काळ बनल्याने लोकांमध्ये रोष जाणवला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here