Monday, August 15, 2022
Homeइतरआरोग्य" बकरी ईद " मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने साजरी करावी: वरिष्ठ पोलीस...

” बकरी ईद ” मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने साजरी करावी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर

लोणीकंद प्रतिनिधी

कोविड -१ ९ च्या संसर्गजन्य प्रादुर्भाव लक्षात घेता लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या मुस्लिम बांधवांची बैठक  आयोजित करण्यात आली होती.मागील वर्षांपासून विविध उपक्रम , कार्यक्रम सार्वजनिक उत्सव , सण अत्यंत साध्या पध्दतीनी साजरे करण्यात आले आहेत . कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे . त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणत एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही . त्यामुळे साध्या पद्धतीने बकरी ईद  साजरी करावी असे आव्हान लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.

यावर्षी दि . २१ जुलै , २०२१ रोजी ” बकरी ईद ” ( चंद्र दर्शनावर अवलंबून ) असुन ती अत्यंत साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे .    त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत ..

१. कोविड -१ ९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे . त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता , नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

२. सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील . नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी ,

३. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी ,

४. लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain , दिनांक ४/६/२०२१ आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील , त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही .

५. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये

६. कोविड या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील .

बकरी ईदनिमित्त प्रशासनाला सहकार्य करत मुस्लिम बांधव घरात नमाज अदा करतील आणि प्रतीकात्मक कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव समाजासाठी एक वेगळा संदेश देईल. पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करत शासनाच्या नियमांचं पालन करत कोरोनाच्या निमित्ताने घरातच हा उत्सव साजरा करतील आणि हा कोरोना लवकरात लवकर जाऊ दे सर्वांना आनंदाने जगता यावे यासाठी यावेळी सर्व मुस्लिम बांधव अल्लाकडे प्रार्थना करतील
     जन मोहम्मद पठाण (निवृत्त पोलीस अधिकारी )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मर्यादित लोकांमध्ये आणि नियमाचं पालन करत  बैठक संपन्न झाली. यावेळी जन मोहम्मद पठाण, रहीम वल्लभाई शेख, तालीब बशीर शेख,नसीर भाई शेख, मोहम्मद सादिक मुगल मणियार चांदभाई शेख या सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांना सोबत बैठकीचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!