पोलिस खात्यातील लाचलुचपत कर्मचाऱ्यांवर बडगा

0
734

पोलिसांकडून पिडीतांसाठी न्याय आंदोलन उभारणार – भोरडे

सणसवाडी : प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले

नुकतेच शिरूर तालुक्यात शिरूर व शिक्रापूर पोलीस ठाण्यातील (Shirur and Shikrapur Police station )दोन पोलीस वेगवेगळ्या प्रकरणात निलंबित करण्यात आले असून तसेच ज्या पोलिसांना लाचलुचपत विभागाने(anti corruption)लाच घेताना केलेल्या कारवाई नुसार निलंबन केले होते, व पुन्हा त्याच पोलिस स्टेशन मध्ये पुन्हा नियुक्ती केली आहे. अश्या १० पोलिस कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली केली आहे. अशी माहिती तक्रारदार माहितीअधिकार कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख(Dr. Abhinav Deshamukh) यांनी दिली. याशिवाय पोलिस स्टेशन मध्ये पोलिसाकडून पिडित झालेल्या नागरीकांना कायदेशीर बाबींची मदत करणार असल्याचे व त्या बाबत आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार असल्याचे सांगितले.

भोरडे यांना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी दिलेल्या माहिती नुसार शिरूर पोलिस स्टेशन मधिल पोलिस उपनिरीक्षक सुरेश कुंडलिक गीते यांना एका प्रकरणातील अटक आरोपीच्या प्रकरणात नातेवाईकांना मदत करण्यास पैसे मागितल्या प्रकरणी शिस्तभंग विषयक कार्यवाही अधीन राहून ११ फेब्रुवारीस निलंबित करण्यात आले. तर शिक्रापूर पोलिस स्टेशन मधील पोलिस उपनिरीक्षक शिवराम विक्रम खाडे डिझेल वाहन अडवून, अपहरण, खंडणी प्रकरणी तसेच वाच्यता न करण्याची धमकी दिली या बाबत शिस्तभंग विषयक कार्यवाही अधीन राहून १५ फेब्रुवारीस निलंबित करण्यात आले. या बाबतचे पत्र भोरडे याना प्राप्त झाले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक खाडे यांची चौकशी खेड उपविभागीय पोलिस अधिकारी करत असून पुढील सखोल चौकशी व कटातील सहभागी यांचा निपक्षपाती पणे तपास व्हावा यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची पोलीस मुख्यालयात तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. २०१३ ला सरकारने परिपत्रक पारित केलेल्या नुसार निलंबित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यास पुन्हा त्याच पोलीस स्टेशन मध्ये नियुक्त करता येत नाही. याबाबत तरी अश्या १० पोलिसांची पुन्हा त्याचा ठाण्यात नियुक्ती बेकायदेशीर पणे केली असल्याचे भोरडे यांनी जिल्हा अधीक्षक निदर्शनास आणून देते १० पोलिसांच्या पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीण येथे करण्यात आल्या आहेत. पोलिस खात्यातील अशी शिस्तभंग विषयक प्रकरणे वाढत चालली असून यातून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. व वागणूक योग्य प्रकारे दिली जात नसल्याने, तसेच वारंवार तक्रार करून हि दखल घेतली जात नाही. या सर्व बाबींबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री , पोलिस महासंचालक याना निवेदन देणार असल्याचे सांगितले. या बाबी गृहमंत्रालयास निदर्शनास आणून देण्यास आझाद मैदान मुंबई पुढे उपोषण करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here