Monday, November 28, 2022
Homeइतरआरोग्यपूरग्रस्तांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत दिला आधार ;व्यवस्थेचा घेतला आढावा

पूरग्रस्तांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत दिला आधार ;व्यवस्थेचा घेतला आढावा

पूरग्रस्तांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभी आहे अशा येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचं नुकसान होत असेल तर कायमस्वरूपीचे बंदोबस्त लवकरच करण्याचे निर्देश देण्यात आले आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली प्रतिनिधी

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यानंतर पुराचे पाणी ओसरू लागला आहे २०१९ सालानंतर पुन्हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्याने थैमान घालत तेथील जनजीवन विस्कळीत केले होते या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील भिलवडी परिसरामधील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेट दिली.

सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधला; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याबाबत माहिती घेतली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा.

वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचं उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीनं तपासण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास दिला आहे.

भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. पाणी भरलेल्या बाजारपेठेची बोटीतून पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत  जलसंपदामंत्री जयंत पाटील पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री विश्वजीत कदम, विधानपरिषद आमदार अरुण लाड आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!