पुन्हा पाऊस, पुन्हा पूर

0
345

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले

सणसवाडी दि . २८ ( वा .) सणसवाडी ता शिरूर येथे व शिक्रापुर,तळेगाव ढमढेरे,करंदी,पिंपळे जगताप परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारासढगफुटी सदृश्य पाऊस सुरु होऊ दिड तास धुव्वाधार पाऊस बरसला आणी ओढ्या नाल्यांना पुर आला . सणसवाडीत यावर्षी ही दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन सणसवाडी गावातून जाणाऱ्या ओढ्यांवरील रस्ता पुलावरून व रस्त्यावर डोक्या इतके पाणी वाढून तासभर रस्ता बंद होता . थोडेसे पाणी उतरता पिकप टाटा एसी गाड्यांवाले जिव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत होते . जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना थांबवत धोका पत्करून पुढे पाण्यातून न जाण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाळासो सैद करत होते तरीही बराच वेळ रोड बंद असल्याने नागरीक पाण्यातून वाट काढत होते . सखल भागातील ओढ्या कडेच्या व रस्त्या कडेच्या खोल्यांनी पाणी शिरल्याचे पोलीस पाटील विठ्ठल वळसे यांनी सांगीतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here