पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्याचा आदेश तर काही तालुक्याचा समावेश नाही

0
545

पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र होत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊसाची रिमझिम आणि धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले ओसांडून वाहत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलामडून पडली असल्यामुळे कुठलीही विघटित घटना घडू नये यामुळे राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगां मध्ये जोरदार वर्षावृष्टी होत असल्यामुळे सर्व धरणे जवळपास भरत आल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहे. 

प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र , पुणे यांचेकडील आदेशानुसार  १४ व १५जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे .         

त्यामुळे पुणे जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता सदर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असलेने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होवू नये याकरीता पुणे जिल्ह्यातील ( इंदापूर , बारामती , दौड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून ) इतर सर्व तालुक्यातील इयत्ता १२ वी पर्यंतच्या ( प्री स्कुल , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक ) सर्व शाळांना १४जुलै ते १६जुलै पर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ राजेश देशमुख यांनी  पुणे जिल्ह्यातील ( इंदापूर , बारामती , दौड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून ) इतर सर्व तालुक्यातील ( प्री स्कुल , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक ) इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना  १४जुलै ते  १६ जुलै रोजी पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे . तथापि , सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्था करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here