शिरूर प्रतिनिधी
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Pune Jilha sahakari dudh sangh) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी (ता .१५) संचालिका केशर सदाशिव पवार ( Keshar Pawar) शिरूर तालुका सर्वसाधारण अ वर्गातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणकीचे रणशिंग फुकले.
नुकत्याच पुणे जिल्हा सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्ता स्थापन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात आनंद तर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत एक प्रकारे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी भाजपला धक्का दिल्याने एक चर्चा रंगली आहे.
यावेळी आमदार अशोक पवार,माजी सभापती सुजाता पवार ,पंचायत समिती सभापती शिरूर मोनिका हरगुडे,मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष रवी काळे,,सुजाता नरवडे ,उद्योजक विकास गायकवाड,हिवरे गावच्या सरपंच शारदा गायकवाड ,दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी,ज्योती मानसिंगभैया पाचुंदकर ,सदाशिव पवार,जातेगावचे उपसरपंच गणेश उमाप,तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल होळकर,करंदी गावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोकले,केंदुर गावच्या मा.सरपंच मीना साकोरे ,साधना जगताप,वंदना प्रकाश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
