
शिक्रापूर प्रतिनिधी
पिंपळे खालसा तालुका शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात अठरा विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले पैकी दोन विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड तसेच पाच विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड व दोन विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव सातारा येथे पात्र ठरल्याने ग्रामस्थ व पालकांनी मार्गदर्शक शिक्षक संभाजी सर्जेराव उमाप(सर)यांना चार चाकी गाडी भेट दिली.पिंपळे खालसा तालुका शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत सन 1971 पासून चालू वर्षापर्यंत शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत चमकणार्या विद्यार्थ्यांचा अविरत यशाचा 491 विद्यार्थ्यांचा पल्ला पार केल्याची माहिती मुख्याध्यापिका ललिता अशोक धुमाळ यांनी दिली सन 2000 पासून तर गावात मार्गदर्शक शिक्षकांना दुचाकी व चारचाकी देण्याची प्रथा सुरू झाली आहे.आत्तापर्यंत तीन दुचाकी व सात चारचाकी गाड्या भेट देण्यात आलेल्या आहे. यावर्षी इयत्ता पाचवीतील मार्गदर्शक शिक्षक संभाजी सर्जेराव उमाप (सर) यांना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर पाटील यांच्या हस्ते स्विफ्ट ही चार चाकी गाडी नुकतीच भेट दिली.शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना उमाप सरांनी मनगटी घड्याळे व इतर विद्यार्थ्यांना पेन बक्षीस दिले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दौंडकर उपसरपंच राजेंद्र धुमाळ व माजी सरपंच पै विशाल धुमाळ यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत ग्रामस्थ व पालकांचे शाळेला असलेले वर्षभर सहकार्य तसेच सर्व सहकारी शिक्षकांचे प्रोत्साहन यांचा सुंदर मिलाफ यामुळे वर्षीचे यश मिळाल्याचे उमाप (सर)यांनी सांगितले.
या कार्यक्रमास राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, डेप्युटी कमिशनर मुंबई डॉक्टर श्रीधर तानाजी धुमाळ, सरपंच सुप्रिया धुमाळ, उपसरपंच राजेंद्र धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी धुमाळ, विशाल धुमाळ,मंगल सुरसे, अश्विनी धुमाळ, माजी सरपंच शहाजी धुमाळ,राजेंद्र धुमाळ, विशाल धुमाळ, रमेश धुमाळ, संदीप सुरसे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धुमाळ, सुभाष गावडे, दत्तात्रय टेमगिरे, संतोष भोगावडे,मारुती सुरसे, राजेंद्र भोसले,अनिल शितोळे, माऊली धुमाळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश दौंडकर, सदस्य ज्ञानेश्वर धुमाळ चंद्रकांत धुमाळ, काळूराम मोरे,मोहिनी शेळके, नवनाथ शेळके, प्रतिभा धुमाळ, त्रिवेणी धुमाळ, संपत धुमाळ, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर , सर्व सहकारी शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप थोरात यांनी केले व रोहिणी धुमाळ यांनी आभार मानले.