प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी दि २४ ( वा .) लोखंडाचे परीस स्पर्शाने सोने होते , तद्वत जिवाला परमार्थाचा छंद लागता जिवनाचे सोने होते , असे प्रतिपादन हभप माऊली महाराज कदम यांनी सणसवाडी येथील भैरवनाथ मंदीर हॉलमध्ये आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात काल्याचे किर्तनात केले .
बऱ्याचदा जिवाला लावण्यांचा – झकपक राहण्याचा शौक असतो . तर संतांना नामनामाचा व देवाला भक्तांचा छंद असतो , पण मानवाचे खरे हित आध्यात्म आंगिकारत परमार्थाचा छंद जोपासण्यात आहे असे त्यांनी तुकोबांचे’ माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा जडलासे, उक्तीचा दाखला देत विवेचन केले .
या सप्ताहात राम महाराज शास्त्री , आदिनाथ महाराज लाड, कुंडलीक महाराज नागवडे, हभप निवृती मतकर, बबन महाराज बहिरवाल ( बीड ) भागवत महाराज साळुंके, पुरुषोतम महाराज पाटील, माऊली महाराज कदम यांची किर्तन सेवा झाली . महाराजांचा व गायक वादक भजनी मंडळींचा सन्मान सरपंच स्नेहल राजेश भुजबळ , मा . सभापती आनंदराव हरगुडे, गोरक्ष दरेकर , रामदास हरगुडे , दत्तात्रय हरगुडे व मान्यवरांचे हस्ते करणेत आला .
दरवर्षी प्रमाणे या वर्षी आनंदात व उत्साहात अंखड हरीनाम सप्ताह साजरा करण्यात आला.यासाठी दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे , उपाध्यक्ष काळुराम हरगुडे व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले .
