Monday, November 28, 2022
HomeइतरUncategorizedपरप्रांतीय लोंढ्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव -राज ठाकरे

परप्रांतीय लोंढ्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव -राज ठाकरे

प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज ठाकरे काही सूचना करणार होते परंतु उद्धव ठाकरे हे होम क्वारंटाईन  असल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी त्यांच्याशी बातचीत केली मागील  लॉकडाऊन मुळे परप्रांतीयांनी  आपल्या राज्यात जाऊन पुन्हा महाराष्ट्र राज्य औद्योगिक असल्यामुळे याठिकाणी परप्रांतीय लोकांचे लोंढेच्या लोंढे आले त्यावेळेस परराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोजली जात नव्हती आणि  परराज्यातून आलेल्या लोकांची संख्या सुद्धा मोजली गेली नाही किंवा त्यांच्या कोरोना चाचणी सुद्धा करण्यात आली नव्हती यामुळे कोरोना चा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप यावेळेस राज ठाकरे यांनी केला त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना आता घरात बसायची वेळ आली आहे.

       यावेळेस काही लोकांनी माझ्याकडे तक्रार आणि सूचना करण्यात आल्या त्यापैकी मी उद्धव ठाकरे यांना काही सूचना केलेल्या आहेत त्या खालील प्रमाणेकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन सारख्या

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन सारख्या पार्श्वभूमीवरती लघुउद्योजकांना मोठा चिंतेचा विषय झाला असून उत्पादन करण्यासाठी परवानगी दिली असून दिली आहे परंतु विक्रीसाठी मात्र परवानगी दिलेली नाही त्यामुळे त्यांचे

अतोनात हाल होत आहे आणि म्हणूनच आठवड्यातून दोन-तीन दिवस त्यांना विकण्याची मुभा देण्यात यावी

आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नागरिकांना बँकेच्या हप्त्यासाठी तगादा लावू नये याबाबत राज्य सरकारने सूचना जारी कराव्या

जीएसटी मध्ये महाराष्ट्र राज्यातील उद्योजकांना 50 टक्के

माफ करावे

शाळा बंद आहे परंतु पालकांकडे फी साठी शाळा व्यवस्थापन तगादा लावला आहे यामध्ये सवलत मिळावी

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्यात यावे

मनोरंजन, सलून, जिम यांसारख्या व्यवसायिकांना आठवड्यातून दोन ते तीन दिवस व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी

तात्पुरत्या सेवेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना परत बोलून कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे आर्थिक

विवंचनेत आणि संकटात सापडणार या शेतीमालाला हमीभाव देत राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगळी स्थिती निर्माण होईल

विनाअनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना पगारासाठी राज्य सरकारने मदत करावी

जानेवारी महिन्यात कोरोनाची लाट वाढत होती त्यावेळी शासनाने वेळीच लक्ष दिले असते तरी आज परिस्थिती आली नसती आवश्यक असणारे कंपन्यांच्या नियुक्त्या करायला हव्या होत्या विविध ठिकाणी बेड शिल्लक असताना सुद्धा आमदार, नगरसेवक यांच्या जवळील नातेवाईकांसाठी ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे उपचारापूर्वीच काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे राज्य सरकारने वेळीच लक्ष देत सक्तीने कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा वजा सज्जड दम राज ठाकरे यांनी दिला असून राज्य व केंद्र या दोघांनी आरोग्य विभागाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे

लसीकरण मुद्द्यावर बोलताना मोठ्या प्रमाणात देणे गरजेचे असून यावरती वयाचं बंधन असू नये एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वय वाढत आहे त्यामुळे शासनाने यामध्ये वेळीच दखल घेणे गरजेचे आहे सर्वांनी सर्वांनी आरोग्याकडे लक्ष केंद्रित करत तात्पुरत्या स्वरूपाच्या कामगारांसाठी मुंबई महापालिकेनं वेळीच लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल का हे पाहणे गरजेचे आहे सचिन वाझे प्रकरण आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा यापेक्षा उद्योजक अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकाची गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवण्यात आली आहे महत्त्वाचा आहे त्यामुळे या प्रकरणातील गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे याकडे लक्ष न देता दुसरीकडे लक्ष विचलीत करण्यात येत आहे अशा प्रकारचा प्रचार प्रसार माध्यम करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला त्या स्फोटकाच्या गाडीची चौकशी होणे गरजेचे आहे    

  यावेळी राज ठाकरे यांनी विनोद करत ” उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे की त्यांच्यावर राज्य आलंय असा सवाल यावेळी त्यांनी केला यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही चिमटा काढला यावेळी प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला की रेस्टॉरंट,हॉटेल बंद आहे यावर गमतीने ते म्हणाले की, ” देशमुखांचे बार पण बंद आहे “.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!