नवरात्रोत्सवात हत्यारवापर प्रतिमादहन व डीजेला बंदी – पो . नि . हेमंत शेडगे

0
203

शिक्रापूर

नवरात्रोत्सवात हत्यारप्रदर्शन, प्रतिमादहन व मिरवणुकात डीजेला पुर्ण बंदी ,असलेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले . शिरूर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना या उत्सवात पालन करण्या विषयीचे नियमांची माहीती देणेसाठी बोलविलेल्या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक शेडगे यांनी मागे उजेडाअभावी कोंढापुरीत महिलेचे छेडछाडीसारखा अनुचित प्रकार घडू नये याचीही दक्षता घेण्याचे आवाहन केले .

यावेळी तळेगावचे माजी सरपंच पोपट भुजबळ व पोलीस पाटील पांडुरंग नरके यांनी पोतसोहळा मिरवणुक ढोलताशाचे निनादात काढत असलेची माहीती दिली . कोरेगावचे माजी सरपंच विजय गव्हाणे व पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी दुर्गादौड व मिरवणुक मार्गातील ट्राफीकवीषयी उहापोह केला . जातेगावच्या पोलीस पाटील इंगवले, वाजेवाडीच्या सोनाली वाजे , करंदीच्या वंदना साबळे, कासारीच्या रुपाली भुजबळ , सणसवाडीचे माजी सरपंच दत्ता हरगुडे, पारोडीचे पो. पाटील कुंडलीक येळे , वरुडेचे भाऊसो शेवाळे, दहीवडीचे जालींदर पवार ‘, मिडगुलवाडीचे राजेंद्र पिंगळे , धानोरे – दरेकरवाडीचे पांडूरंग दरेकर ,हिवरेचे बाबाजान शेख , खैरवाडीचे मंगेश चव्हाण , वढुचे जयसिंग भंडारे , अरणगावचे संतोष लेंडे, धामारीचे आत्माराम डफळ , रोहीत थोरात , अरुण पवार, बालाजी चव्हाण यांनी आपापल्या गावचे उत्सवातील कार्यक्रमांची माहीती दिली .

यावेळी सहा.पोलीस निरीक्षक अतकरे, सहा.पो. नि .स्वामी, पो. उपनिरिक्षक .खटावकर, पो. उपनिरिक्षक .माळी , पोलीस पाटील संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष प्रकाश कर्पे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना अध्यक्ष बाळासो शिंदे व नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधीकारी उपस्थीत होते . उत्सवात शारीरीक ईजा होईल अशी तलवार काठी भाला बंदुका आदि कोणतेही हत्यार नसावे व पुतळा वा प्रतिमादहनास मनाई असून डीजेवर बंदी आहे असे स्पष्टपणे सांगून या दुर्गोत्सवाचे पावित्र्य राखत नियमांचे काटेकोर पालन व्हावे व अर्ज करून परवानगी घ्यावीअसे आवाहन शेडगे यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here