नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन (चिंचोली मोराची)माध्यमातून सार्वजनिक उपक्रम मधुन हळंदी कुंकु कार्यक्रम संपन्न

0
442
कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर महिला उपस्थित होत्या

शिरूर प्रतिनिधी

शिरूर (पुणे) तालुक्यातील चिंचोली मोराची मध्ये नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन (Navjyot gramvikas foundation )माध्यमातून हळंदी कुंकुचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रम निमित्त विविध सार्वजनिक उपक्रम चे नियोजन करण्यात आले होते.वृक्षारोपण केलेली झाडांना आळ करणे, झाडाना पाणी देणे,साफसफाई शाळेच्या परिसरात अशी विविध कामे करण्यात आले.

या हळंदी कुंकुच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील(Swati Panchudkar) व स्मिता शेखरदादा पाचुंदकर पाटील उपस्थित होत्या. चिंचोली मोराची मधील माता भगिनी यांनी बहुसंख्यने उपस्थिती दर्शविली.तसेच शितल नाणेकर, आनंदी नाणेकर,सामाजिक कार्यकर्त्यां भारती गणेश धुमाळ यावेळी उपस्थित होते.

नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन मधून अध्यक्ष अक्षता उकिर्डे,महिला कल्याण अध्यक्ष रूपाली उकिर्डे व महिला कल्याण उपाध्यक्ष छाया उकिर्डे यांनी हळंदी कुंकुचे आयोजन केले होते.

यांनी या कार्यक्रम मधुन महिला ना आवाहन करण्यात आले की महिलानी एकञ येऊन संवाद साधून एकजूटने गावच्या विकासला हातभार लावला पाहिजे.महिला सशक्तिकरणची आवश्यकता आहे.हळंदी कुंकुच्या कार्यक्रमाने सगळे एकञ आले.अशी एकजूट दाखवली पाहिजे असे नवज्योत ग्रामविकास फाउंडेशन माध्यमातून सांगण्यात आले.आनंदीताई नाणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here