दसऱ्यानिमित्त झेंडूची शतकीय खेळी परंतु शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशा

0
349

सणसवाडी

दसरा हा सण साडेतीन मुहूर्त पैकी एक सण असल्यामुळे  झेंडू फुलाला मोठयाप्रमाणात मागणी असते. यावेळी बाजारात झेंडूच्या फुलांला शंभर सव्वाशे रुपये बाजार मिळत असून यामुळे शेतकऱ्याच्या हातात काही प्रमाणात पैसे जरी मिळत असले तरी अतिवृष्टी मुळे मोठ्याप्रमाण झेंडू पिकाचे नुकसान झाले. यामुळे झेंडू पिकापासून उत्पादन मात्र घटलं आहे. अतिवृष्टी मुळे फुले सडून गेली तर काही फुलावर माती साचली असून मोठ्याप्रमाण नुकसान झाले.
     बाजारात झेंडूला चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर घेऊन झेंडू तोडणीची लगबग दिसत आहे. कधीकाळी ऐन सणासुदीच्या काळात झेंडू रस्त्यावरती फेकून देण्याची वेळ येते परंतु चांगला बाजारभाव असताना निसर्गाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी मात्र पुरता हतबल झाला आहे.
पूना नगर रोडवर औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाला मागणी असते या साठी शिक्रापूर येथील ताजने कुटुंबीयांनी झेंडू फुलाची लागवड आपल्या शेतामध्ये केली होती या परिस्थितीचा आढावा घेतला आहे

झेंडू फुलाला चांगला बाजार असल्याने ताजणे कुटुंबीयांची तोडणीची लगबग
बाजार भाव चांगला परंतु शेती उत्पन्नात घट यामुळे शेतकरी चिंतेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here