शिरूर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांना सीएसआर फंडाचे आमिष दाखवून ग्रामपंचायत सरपंचाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
शिरूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत कोरेकर यांची निवड
अनिरुद्ध टेमकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीने शिरूर तालुक्यातील आंबळे गावच्या सरपंचांना दूरध्वनीवर संपर्क करत तुम्हाला गावच्या विकासासाठी सीएसआर फंडातून विकास कामे करून देऊ असे सांगत स्व:ताच्या वैयक्तिक खात्यावर( Banks Account )काही रक्कम जमा करण्यास सांगत ; फसवणूक केली आहे.
43 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त; शिक्रापूर पोलीसांनी वाहतूक करणाऱ्या 3 वाहनावर केली कारवाई सुरू आहे.
या ठकेबाज आरोपीने शिरूर तालुक्यातील आंधळगाव,शिरसगाव काटा,गणेगाव दुमाला, कुरुळी, कोळगाव डोळस,या गावच्या सरपंचांना ही सीएसआर फंडातून विकास कामे करून देऊ असे सांगत फसवणूक केली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

सदर कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आणि वरिष्ठाच्या मार्गदर्शना खाली ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने केला आहे.