शिक्रापूर प्रतिनिधी.
विद्युत ट्रान्सफार्मरमध्ये शुध्द तांबे असते. हे तांबे चोरणारी टोळी पुणे जिल्ह्यात सक्रीय असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली. पोलीसांनी सापडा रचून चोरीचा बेतात असलेल्या तीन चोरांना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सफर चोरीच्या अनुषंगाने तपास करत असताना तळेगाव ढमढेरे येथे तीन इसम अजय मांगीलाल काळे, (रा. इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे,) ,आनंद इंद्रभान भोसले, विकास दिपक पवार (दोघे रा. मुखई, तालुका शिरूर जिल्हा पुणे) यांच्याकडे गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नितीन अतकरे ,सहाय्यक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक अमोल दांडगे ,श्रीमंत होनमाने, रोहिदास पारखे, विकास पाटील,शिवाजी चितारे, व पोलीस शिपाई लखन शिरस्कर,निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी सदर वरील आरोपींना शिताफीने पकडले असता त्यांच्याकडे एक पल्सर मोटरसायकल, एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे मिळून आली त्यांना गुन्ह्याचे तपास कामी शिरूर न्यायालय येथे हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्या दरम्यान आरोपी यांनी तळेगाव ढमढेरे,भीमा टाकळी, विठ्ठल वाडी व करंदी गावच्या हद्दीमधल्या वेगवेगळे पाच ट्रांसफार्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरी केली कबुली दिली.सदर आरोपी यांचेकडून १०३ किलो कॉपर तांब्याच्या तारा जप्त करण्यात आले असून एकूण- १,५१,७००/- रू. मुद्देमालासह मिळून हस्तगत करण्यात आला आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली असून पुढील तपास पो ना सागर कोंढाळकर, पो ना शिवाजी चितारे व पो ना. रोहिदास पारखे हे करीत आहेत.