Monday, November 28, 2022
Homeइतरआरोग्यकोरेगाव-भीमा परिसरात प्लास्टिकसह कचऱ्याचे साम्राज्य; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

कोरेगाव-भीमा परिसरात प्लास्टिकसह कचऱ्याचे साम्राज्य; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

कोरेगाव भीमा – प्रतिनिधी

कोरेगाव भीमा ( ता.शिरूर))शिरूर तालुक्यात नामांकित व कोट्यवधीचे उत्पन्न असणाऱ्या,  मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या कोरेगाव भिमा ग्रामपंचायत सध्या कचरा व्यवस्थापनाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. ऐतिहासिक व धार्मिक अत्यंत महत्व   असलेल्या पवित्र  भीमा नदी जवळ खाजगी जागेत कचरा गोळा करून टाकण्यात येत असून याबाबत कसलीही प्रक्रिया अथवा पर्यावरणाची हानी होणार नाही, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही अशा प्रकारे काळजी घेण्यात नसल्याचे दिसत आहे.  कोरेगाव भिमातील स्मशान भूमी शेजारी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे .अगदी जवळच १००- १५० मिटरवर पवित्र अशी भीमा नदी वाहते, एकीकडे प्लास्टिक व इतर प्रकारच्या कचऱ्याचा ढीगच्या ढीग पडलेले व लांबवर घाणीचे साम्राज्य पसरलेले, तर त्या कचऱ्यात गाय पोटाची भूक म्हणून अन्न शोधत त्यामध्ये चरत आहे , डोकं गरगरायला लागेल अशी उग्र दुर्गंधी पसरलेली असून अशा प्रकारचे विदारक आणि भयाण चित्र कोरोणासारख्या भीषण कालावधीत कोरेगाव भिमा येथील पवित्र भीमा नदी किनाऱ्याजवळ पाहायला मिळत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!