कै. श्री. दत्तात्रय हरगुडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त कीर्तन सोहळा

0
569

सणसवाडी (ज्ञानेश्वर मिडगुले)

जीवनात संपत्ती, पैसा कमी मिळाली तरी चालेल पण पालकांनी मुलांना संस्कारी बनवा असे प्रतिपादन हभप नवनाथ महाराज मशिरे यांनी केले.

व्यावहारिक जगात जात असताना मुलांना संस्कार गरजेचे आहे. कै. श्री. दत्तात्रय बबन हरगुडे यांनी त्यांच्या जीवनात जगत असताना त्यांच्या कार्याची दखल समाज नक्कीच घेईल. त्यांनी जीवन असताना संघर्षातून स्वतःची वाट शोधत स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या कार्यात कामगार, शिक्षण, राजकीय सामाजिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय त्याच मार्गाने त्यांचा वसा नक्कीच जपत आहे. त्यांनी कमी कालावधी निर्माण केलेले विश्व खरंच प्रेरणादायी आहे.

स्व. दत्तात्रय हरगुडे यांनी या परिसरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शिक्षणाची कवाडे उघडून सामाजिक बांधिलकी जापली आहे. कामगार क्षेत्रात अकुशल कामागारांना माथाडीच्या माध्यमातून रोजगार असेल, कामगार आणि व्यवस्थापन यातील दुवा म्हणून कामगिरी केल्याने त्यांना कामगार नेता ही पदवी सामाजाने भाल केली आहे. राजकारण्यातील क्षेत्रात सामाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनात केलं आहे.

आज हरगुडे कुटूंबातील त्यांच्या पत्नी सुनीता हरगुडे ह्या जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कुल यांची जबाबदारी समर्थ पणे पेलत आहे. तर त्यांचे भाऊ सुरेश हरगुडे आणि मोहन हरगुडे हे त्यांचा राजकीय वसा चालवत असून आध्यात्मिक क्षेत्रात दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदिनाथ हरगुडे काम करत आहे. त्यांचा वारसा जतन करून समाजातील वंचित घटकाच्या न्याय मिळून देण्याचा विचाराचा वारसा पुढे नेहण्यात आग्रभागी राहतील.

त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सत्तर लोकांनी सहभाग घेत रक्त हेच श्रेष्ठ दान या भूमिकेतून सहभाग घेतला. आलेल्या लोकांना महाप्रसाद देत अन्नदान करण्यात आले.

याप्रसंगी माजी सभापती प्रकाश पवार, सभापती मोनिका हरगुडे , माजी उपासभापती आनंदराव हरगुडे , मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, सरपंच संगिता हरगुडे, कॉग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, गिता गोरक्ष भुजबळ , माजी चेरअमन गोरक्ष दरेकर ,संपत साकोरे , दिलीप महाडीक, भानुदास साकोरे , प्रकाश शिवले , शांताराम कटके , राजाभाऊ मांढरे, नवनाथ हरगुडे , बाळासो सैद , विद्याधर दरेकर , बापुराव हरगुडे, , रामदास दरेकर ,दिंडी मंडळाचे अध्यक्ष आदीनाथ हरगुडे, खजीनदार मोहन दरेकर, सचिव मोहन हरगुडे,सप्ताह मंडळांचे उपाध्यक्ष काळुराम हरगुडे , मोहन हरगुडे , बबुशा दरेकर , काकासो चव्हाण , राजाभाऊ मांढरे , रवि भुजबळ , हभप राजेंद्र गरुड , विकास जाधव , चेअरमन सुरेश हरगुडे , भानुदास दरेकर , अलाउन्सर ढोरे , ढोकले डॉ. सोमनाथ गव्हाणे, कानिफ गव्हाणे, भाजपा नेते गणेश कुटे , विशाल कुटे, अजित कुटे,बबन चव्हाण, गणेश चव्हाण,पुणे ब्लड बॅकेस डॉ . राहुल तोळनुरे यांच्या सह हरगुडे परिवाराचे आप्तेष्ट उपस्थित होते .

चि . वेदांत, मोहन व हरगुडे परिवाराने कै . दताभाऊंचे प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली . हमप माशेरे महाराज व सर्व हरीपाठ मंडळ  व भजनी मंडळाचे सदस्यांस मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सन्मानीत करणेत आले . शेवटी उपस्थितांना महाप्रसाद भोजनाने या पुण्यस्मरणाचीसांगता झाली .

सणसवाडी फोटो : हभप नवनाथ महाराज माशेरे हे दताभाऊ हरगुडे यांचे पुण्यस्मरण प्रसंगी किर्तनसेवा करतानाव व्हीडीओ क्लिप (ज्ञानेश्वर मिडगुले )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here