औद्योगिक वसाहतीत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

0
559

प्रतिनिधी रांजणगाव

शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित होत असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीत याझाकी इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीचे प्लांट हेड आर. पी.सिंग आणि एच. आर प्रमुख सुरेश ननवरे यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

कंपनीचे प्लांट हेड आर. पी.सिंग आणि एच. आर प्रमुख सुरेश ननवरे यांच्या उपस्थित शिवजयंती साजरी

विविध विभागाचे प्रमुखासह,कामगार सर्व कामगार सहभागी होत उत्साह शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त विविध मान्यवारांनी आपली मनोगत व्यक्त करण्यात आली.

यावेळी प्लांट हेड आर पी सिंग म्हणाले की, “शिवाजी महाराज हे व्यक्ती नसून एक विचार आहे. त्यांच्याबद्दल ऐतिहासिक दाखल्यामध्ये लढाई पलीकडे स्वराज्याला काय आवश्यक आहे यांचा ते बारकीने विचार करत असताना कमी मनुष्यबळात मोठ्या संकटाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देत स्वराज्य उभं केलं. हतबल न होता त्यांनी कोणतीच गोष्ट सोडून दिली नाही त्याचं प्रमाणे आपण आपल्या कार्यक्षेत्रात नेहमी हाताश न होता मार्ग काढत जोमाने काम केलं पाहिजे. आपल्या कारखान्यात असणाऱ्या साधन सामग्री जोरावर आपल्या कारखान्याला एका उंची वर नेहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. तर आपण शिवजयंती साजरी केल्याचं सार्थक होईल”.

सर्व कामगारांना गोड पदार्थ भेट देत शिवजयंती साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here