Monday, November 28, 2022
Homeइतरआर्थिकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी केले  उद्घाटन ,अजित पवार यांच्या वेळ पाळण्याच्या व  धडाकेबाज कामाबाबत शिरूर करांमध्ये चर्चा

शिरूर प्रतिनिधी (दिनांक १ ऑक्टोंबर)
शिरूर( ता.शिरूर) येथे शिरूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण आनंदाच्या वातावरणात पार पडला.  सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरलेल्या वेळी उपस्थित राहत सर्वांना वेळेचे व कामाच्या धडाकेबाज कामगिरीचा पुन्हा एकदा शिरुरकरांना परिचय आला असून अजित पवारांच्या वेळ पाळण्याबाबत काटेकोरपणाची संपूर्ण शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा पाहायला मिळाली.

शिरुर लोकसभा मतदारसंघात शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन  राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.सुसज्ज अशा या इमारतीत सर्व प्रशासकीय विभागांच्या कार्यालयाची पाहणी केली . शिरुर नगरपरिषदेची भव्य इमारतीमुळे शिरुर शहराच्या वैभवात भर पाडणारी आहे . या नवीन तीन मजली प्रशासकीय इमारतीत नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व अद्ययावत दालन असून , सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालने आहेत . जनरल बोर्ड मिटींगसाठीचे भव्य व अद्ययावत सभागृह हे या नवीन इमारतीचे खास आकर्षण आहे . या नवीन प्रशासकीय इमारतीमधील सर्व कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिरूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांचा वेळ व शब्द पळण्याबाबतचा आदर्श काही पुढारी घेतील काय? अजित पवारांचा  कामाचा धडाका व शब्दांचा कृतीयुकत फटका भल्याभल्यांना माहिती आहे त्यामुळे अजित पवार यांच्या कामाचे व वेळेचे  आश्चर्य सर्वांनाच वाटा असते
नवीन प्रशासकीय इमारतीतील बारकावे समजून घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज व गुणवत्तापूर्ण कामाची, खुमासदार ,ग्रामीणबाज असलेले, विनोदी आणि चूक करणाऱ्याला धाक बसवणारी भाषणाची व दिलदार व दिलखुलास व्यक्तिमत्वाची भुरळ अवघ्या महाराष्ट्रातील तरुणाईला पडत असते आणि जाच प्रत्यय शिरूर करांना पुन्हा एकदा आला. शिरूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन अजित पवारांनी उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षीने केले सकाळी नियोजित वेळेवर सकाळी बरोबर ६ वाजून २८ मिनिटांनी उद्घाटन करून पुन्हा एकदा आपल्या वेळ पाळण्याबाबत कृतियुकत उदाहरण ग्रामीण भागातील नेत्यांसह नागरिकांसमोर ठेवले आहे                

शिरुर नगरपरिषदेच्या नूतन इमारत उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार , आमदार अशोक पवार , माजी आमदार पोपटराव गावडे , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात , राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , रविकाळे , शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत कोरेकर , शिरूरच्या नगराध्यक्ष वैशाली वाखारे , सभागृह नेते प्रकाशशेठ धारिवाल , मुख्याधिकारी प्रसाद बोरकर , सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!