उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर

0
996

मांडवगण प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्ताने मांडवगण फराटा येथे रावलक्ष्मी ट्रस्ट, एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी, हडपसर, पुणे आणि मांडवगण फराटा ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात तपासणी झालेल्या मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय मध्ये रावलक्ष्मी ट्रस्ट मार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व त्यानंतर मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी वृद्ध महिला मंडळी यांनी या सेवेचा फायदा घेत माजी जिल्हा परिषद सभापती सुजाता पवार यांना डोक्यावर हात ठेवून कौतुक केले आमच्यासारख्या वृद्ध महिलाचा आपण आजही विचार करत असल्याचा भावना व्यक्त करत अशाच प्रकारे समाजजीवनात जगत असताना समाजभान असणे गरजेचे असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. या भावना व्यक्त होत असताना सुजाता पवार भाऊक झाल्या होत्या.

शिबिर उद्घाटन प्रसंगी बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी आण्णा कदम, संभाजी आप्पा फराटे, जगन्नाथ जगताप, धनंजय फराटे, प्रतिभाताई बोत्रे, सुरेखाताई जगताप, अंकुश आण्णा शितोळे, शरद चकोर, सुभाषराव फराटे, अर्जुन नाना कोंडे, बबन काका फराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here