Friday, October 7, 2022
Homeशहरंपुणेआ. अशोक पवारांनी घातला उद्घाटन कार्यक्रमांचा सकाळीच घाट

आ. अशोक पवारांनी घातला उद्घाटन कार्यक्रमांचा सकाळीच घाट

कोरोना काळात प्रशासनाच्यावतीने राजकीय, सामाजिक,धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली असताना नेत्याच्या प्रेमापोटी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे टाळण्यासाठी दस्तुर खुद्द आमदार पवारांनी स्थानिक प्रशासनाला गर्दी न करता कार्यक्रम थोड क्यात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित संपन्न करण्याच्या अटीवर(दि.१८)सकाळी सात वाजण्याच्या नियोजित वेळेत करण्यात आला.

सणसवाडी प्रतिनिधी        

काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरूर नगरपरिषदेचा उद्घाटन सोहळा भल्या पहाटे मोजक्या मान्यवर लोकांच्या उपस्थित संपन्न झाला होता. याच पद्धतीने आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत सणसवाडीतील विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात साठी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर , खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे , उद्योजक हरिष येवले,मनसेचे रामदास दरेकर यासह सणसावाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर , उपसरपंच सागर दरेकर , माजी उपसरपंच विजयराज दरेकर , ग्रां प. सदस्य राजेंद्र दरेकर, दत्तात्रय हरगुडे , ललिता दरेकर ,माजी चेअरमन सुहास दरेकर , अनिल दरेकर , उद्योजक नवनाथ दरेकर, दगडू दरेकर,रामदास दरेकर,राजेश भुजबळ,नाना दरेकर,काळूराम दरेकर , अनिल गोटे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 

       

कोरोना नियमाचं काटेकोरपणे पालन करण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे वारंवार सांगत असतात त्यामुळे माझ्यापासून सुरुवात करत कमी लोकांच्या उपस्थितीत आपण सर्वांनी कार्यक्रम घेतले पाहिजे.यामुळे नागरिकांचे जीवन सुरक्षित राहिलं , अर्थव्यवस्थेवर यांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नाही.यांची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे

– अँड अशोक पवार ( आमदार शिरूर –  हवेली विधानसभा )

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सणसवाडी ग्रामपंचायतवतीने विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्वांनाच बोलणं गरजेचं होतं परंतु कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मोजक्‍याच मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाल्याने दिलगिरी व्यक्त करत आहे

सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर

सणसवाडी पोलीस मदत केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार अशोक पवार आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह पदाधिकारी

सणसवाडी औद्योगिक परिसरातील गुन्हेगारांना आळा आणि नागरिकांना जलदगतीने पोलीसांची मदत मिळावी या उद्देशाने सणसवाडी येथे कायम स्वरूपाची पोलीस मदत केंद्रांची आणि अधिकारांची सणसवाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने मागणी वारंवार केली जात होती. परंतु सुसज्ज कार्यालय उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून मदत झाली आहे असे यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.यासाठी आमदार अशोक पवार यांच्या आमदार निधीतील १५ लाख खर्च करून सांस्कृतिक भवन उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ३४लाख खर्च करून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन तर सुमारे १० लाख खर्च करून सणसवाडी येथील मुक्तीधाम घाटाचे सुशोभिकरण तसेच पार्कींग व्यवस्थेबरोबरच स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. यावेळी विकास करताना पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख असला पाहिजे यासाठी प्रत्येकाने यांची खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन आमदार अँड अशोक पवारांनी केले. नियोजित वेळेमध्ये आमदार अशोक पवार यांनी सर्व ठिकाणी भेट देत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

error: Content is protected !!