आर्मी कमांडंट यांचे हस्ते ह.भ.प किसन नाणेकर यांना सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला

0
231

सणसवाडी (ज्ञानेश्वर मिडगुले )

चिंचोली मोराची दि . २५ ( वा .) ता . शिरूर येथील खडकी येथे  आर्मी वर्कशाप मध्ये गेली ३0 वर्ष कार्यरत असलेले आदर्श कामगार हभप किसन नाणेकर यांना २०२२ चा आर्मी बेस वर्कशॉप खडकीचा सर्वोत्कृष्ट कामगार म्हणून ‘ कमांडंट अँप्रीसिएशन ‘ हा पुरस्कार आर्मीचे कमांडंट यांचे हस्ते प्रदान करणेत आला . आतापर्यंत त्यांना हा पुरस्कार २४ वेळा मिळून आर्मीचे वर्कशॉपचे इतिहासातील एक रेकॉर्ड ब्रेक झाल्याचे दिसते . एक कष्टाळू मेहनती कुशल कामगार म्हणून त्यांची ओळख आहे.   

याशिवाय धार्मिक अध्यात्मीक सामाजीक क्षेत्रात हभप किसन नाणेकर यांचे मोठे योगदान आहे . पंढरपुरला जाणाऱ्या निळोबाराय पालखीचे रथाचे काम ते स्वतः आवडीने करतात . आणी १५ दिवस रजा टाकून ते प्रतिवर्षी चिंचोली मोराची येथील म्हाळसाकांत दिंडी सोहळ्यात जातीने सहभागी होऊन पायी चालत भजन नामघोषात सामील होत रात्री भजन गायनात प्रमुख भुमिका बजावतात . त्यांचे आर्मी रीटायर बंधूसह सारा परीवार भावीक धार्मिक असून समाज्याला वेगळाच आदर्श मिळतो . चिंचोली मोराची परीसरात त्यांचे प्रामाणिक कामाचे कौतुक होत आहे . दिंडी सोहळ्यातील वारकर्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here