सणसवाडी

औद्योगिक नागरी म्हणून ओळख असणाऱ्या सणसवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकवृंदानी मार्गदर्शन केले त्या शिक्षकाचे आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी कटिबद्ध असल्यामुळे कौतुकाची थाप म्हणून प्रारंभ प्रॉपर्टीचे चेअरमन माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांच्या माध्यमातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी) शाळेतील उपशिक्षक भाऊसाहेब उचाळे,दहिफळे आणि इनामदार मॅडम यांना तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील उपशिक्षक संभाजी ठुबे, ज्योस्ना हरगुडे यांचा सत्कार आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये वह्या देण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून यांच्या वतीने आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये वह्या उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमासाठी याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे,माजी उपसरपंच शिवाजी दरेकर सणसवाडीच्या सरपंच संगीता हरगुडे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,विजयराज दरेकर,नवनाथ दरेकर दगडू दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच राहुल दरेकर महादेव हरगुडे सामाजिक कार्यकर्ते रामदास दरेकर,सुभाष दरेकर गोरख भुजबळ हिरामण दरेकर,हरीश हरगुडे, बबन दरेकर, बापूसाहेब दरेकर,संतोष दरेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर हरगुडे उपाध्यक्ष अमोल दरेकर,प्राध्यापक अनिल गोटे, मुख्यध्यापक संतोष गोसावी यासह आदी मान्यवर उपस्थित होते वसेवाडी शाळेतील उपशिक्षक पडवळ व मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी आभार व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here